शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

प्रतीक्षा संपली! व्हॉट्सऍपमध्ये आली पाच नवी फीचर, खूश होणार युजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2020 15:22 IST

सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं व्हॉट्सऍप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं.

नवी दिल्लीः सोशल मीडियावरचं प्रभावी माध्यम असलेलं व्हॉट्सऍप नेहमीच नवनवीन फीचर्स आणत असतं. युजर्सला आश्चर्यचकित करण्याची एकही संधी व्हॉट्सऍप सोडत नाही. व्हॉट्सऍपनं मोबाइल ऍप आणि वेबसाठी नव्या फीचर्सची घोषणा केली आहे. यात ऍनिमेटेड स्टिकर्ससह अनेक प्रकारच्या फीचर्सचा समावेश आहे. व्हॉट्सऍप ग्रुप कॉलिंग फीचरही अद्ययावत करण्यात आलेलं आहे. फेसबुकची मालकी असलेल्या व्हॉट्सऍपमध्ये जिओ फोनवर स्टेट्स सपोर्ट मिळणार आहे. त्याशिवाय वेबवर व्हॉट्सऍप डार्क मोडची सुविधाही मिळणार आहे.येत्या काही दिवसांत ही फीचर्स ग्राहकांना वापरता येणार आहेत. पहिलं फीचर हे ऍनिमेटेड स्टिकर्सशी संबंधित आहे. मेसेज पाठवताना स्टिकर्सचा जास्त करून वापर केला जातो. त्यामुळेच आता अनलिमिटेड आणि मजेदार स्टिकर्स वापरता येणार आहेत. व्हॉट्सऍपनं क्यूआर कोडच्या फीचर्सही घोषणा केली आहे. या प्लॅटफॉर्मवरून नवे कॉन्टॅक्ट जोडणं सहजशक्य होणार आहे. जेव्हा एखाद्या नव्या व्यक्तीला आपण भेटाल, तेव्हा त्याला फक्त क्यूआर कोड स्कॅन करायला सांगितल्यानंतर तो तुमच्या व्हॉट्सऍपशी जोडला जाणार आहे.व्हॉट्सऍप वेबसाठी डार्क मोडचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, वेब किंवा डेस्कटॉपवर ही फीचर्स आपल्याला वापरता येणार आहेत. या सुविधेची युजर बऱ्याच काळापासून वाट पाहत होते. तसेच व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगच्या सुविधेतही सुधारणा करण्यात आली आहे. आता व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओच्या माध्यमातून चारऐवजी ८ जणांना एकमेकांशी गप्पा मारता येणार आहेत. व्हॉट्सऍप ग्रुप व्हिडीओ कॉलिंगची सुविधा अपडेट करत बिटावरून ती व्हॉट्सऍपच्या स्टेबल व्हर्जनमध्ये रुपांतरीत करण्यात येणार आहे. तसेच KaiOS युजर्सही व्हॉट्सऍपवर स्टेट्स शेअर करू शकणार आहेत. जे २४ तासांनंतर बदलणार आहे. 

हेही वाचा

SBIचा ग्राहकांना अलर्ट! ATMमधून पैसे काढण्याचे नियम बदलले; जाणून घ्या अन्यथा बसेल फटका

अखेर शिवराजसिंह चौहानांच्या मंत्रिमंडळाचा 'जंबो' विस्तार; जाणून मंत्र्यांची संपूर्ण लिस्ट

...म्हणून मोदींच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल; शिवसेनेची अ‍ॅपबंदीवर 'टिक', पण भाजपाला 'टोक'लं!

मोठी बातमी! राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन २०३६पर्यंत रशियावर सत्ता गाजवणार

चीनची कबुली! भारतात TikTok अ‍ॅप बंद झाल्यानं होणार अब्जावधी डॉलरचं नुकसान

कोरोना देशातून जाणार नाही, जुलै अन् ऑगस्टमध्ये मोठा फैलाव होणार, भारतीय संशोधकांचा गंभीर इशारा

बापरे! कोरोनापाठोपाठ नव्या संकटाचा वैज्ञानिकांचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेच्या सूचना

आजचे राशीभविष्य - 2 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना कौटुंबिक जीवनात सुखांचा अनुभव मिळेल

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅप