शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

WhatsApp वर मोठा धोका! युजर्सनी 'या' नंबवरवर चुकूनही कॉल केला तर होऊ शकते अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2022 13:09 IST

WhatsApp : ज्या युजर्सची फसवणूक करायची आहे, त्या युजर्सला हॅकरचा कॉल येतो. त्यानंतर युजर्सला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितले जाते.

नवी दिल्ली : व्हॉट्सअ‍ॅपवर (WhatsApp) हॅकिंगचा धोका मोठ्या प्रमाणात वाढताना दिसून येत आहे. युजर्सची फसवणूक करण्यासाठी हॅकर्स नव-नवीन पद्धतींचा अवलंब करतात, यामध्ये हॅकर्स व्हॉट्सअ‍ॅप सिक्युरिटी कोड ब्रेक करून अकाऊंटमध्ये अ‍ॅक्सेस करत आहेत. CloudSEk चे सीईओ आणि संस्थापक राहुल सासी (Rahul Sasi) यांनी म्हटले आहे की, हॅकर्सनी आता नवी पद्धत अवलंबली असून ते युजर्सचे अकाऊंट अ‍ॅक्सेस करत आहेत. ही नवीन ट्रिकची पद्धत खूप सोपी आहे, ज्याद्वारे व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंट हॅक केले जाऊ शकते, असेही राहुल सासी यांनी सांगितले. 

ज्या युजर्सची फसवणूक करायची आहे, त्या युजर्सला हॅकरचा कॉल येतो. त्यानंतर युजर्सला एका विशिष्ट नंबरवर कॉल करण्यासाठी सांगितले जाते. जर युजर्सने नंबर डायल केला, तर हॅकर्स आरामात युजर्सच्या अकाउंटवर आरामात ताबा मिळवू शकतो. या नवीन फसवणुकीबाबत राहुल सासी म्हणाले की, ही खूप सोपी आणि छोटीशी प्रक्रिया आहे. 

हॅकिंगसाठी हॅकर्स युजर्सला कॉल करतात. त्यानंतर युजर्सला '**67*<10 डिजिट नंबर > या *405*<10 डिजिट नंबर >’ डायल करण्यासाठी तयार करतात. अशा परिस्थितीत जर चुकूनही युजर्सनी यावर कॉल केले तर ते मोठ्या अडचणीत सापडू शकतील आणि त्यांच्या अकाऊंटचे अ‍ॅक्सेस हॅकर्सजवळ जाईल. अ‍ॅक्सेस मिळवल्यानंतर हॅकर्स युजर्सला संबंधित कॉन्टॅक्टद्वारे पैशांची मागणी करतात. दरम्यान, असे झाल्यानंतर युजर्सला समजते की, त्यांचे अकाऊंट हॅक झाले आहे. 

युजर्स कसे सुरक्षित राहतील?जर कोणतीही व्यक्ती कोणत्याही सर्व्हिस प्रोव्हायडरच्या नावाखाली तुम्हाला 67 किंवा 405 ने सुरू होणार्‍या नंबरवर कॉल करण्यास सांगत असेल तर ते कधीही करू नका. याशिवाय, अशा धोक्यांपासून सुरक्षित राहण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे तुमच्या व्हॉट्सअ‍ॅप अकाऊंटवर 2-स्टेप व्हेरिफिकेशन करावा आणि लॉग इन करण्यासाठी पासवर्ड किंवा पिन सेट करावा, असा सल्ला राहुल सासी यांनी दिला आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानCrime Newsगुन्हेगारी