whatsapp new emoji list 230 new emoji will be added soon here the list | WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार
WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे.व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. तसेच व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे.

व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.नवीन इमोजीमध्ये व्हीलचेअरवर बसलेला माणूस, गाईड डॉगसारख्या नव्या इमोजींचा समावेश आहे. तसेच युनिकोडने काही नवीन रंगाची चिन्हंही प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये ह्रदय, सर्कल आहे. यासोबतच युजर्सच्या मागणीनुसार सफेद ह्रदयाच्या चिन्हांचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. हे इमोजी फायनल करण्यात आले असले तरी काही दिवसानंतर ते स्मार्टफोनमध्ये उपलब्ध होणार आहेत. नवीन इमोजी या वर्षाच्या सप्टेंबर किंवा ऑक्टोबरपर्यंत स्मार्टफोनमध्ये दिसण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर अनेकजण शब्दांचा वापर करण्याचा ऐवजी अनेकदा भावना व्यक्त करण्यासाठी खासकरून इमोजीचा वापर करतात. दररोज एकूण 90 कोटी युजर्स एकमेकांना इमोजी सेंड करतात. या प्रत्येक इमोजीचा अर्थ जाणून घेण्यासाठी इमोजीपीडियासुद्धा तयार करण्यात आले आहे. युनिकोड स्टँडर्ड लिस्टमध्ये 2666 इमोजी आहेत. 

English summary :
Whatsapp New Emoji List 2019: Whatsapp will include 230 new emoji soon. Unicode has announced the new 230 emoji official list for 2019. In the emoji list on Whatsapp, 59 new emoji includes 171 variants. Although this emoji was finalized, it will be available on a smartphone after a few days. The new emoji is likely to appear in the smartphone segment by September or October of this year.


Web Title: whatsapp new emoji list 230 new emoji will be added soon here the list
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.