शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

युजर्सची मागणी व्हॉट्सअ‍ॅपनं ऐकली; दोन-दोन स्मार्टफोन्समध्ये एकाच नंबरचं WhatsApp 

By सिद्धेश जाधव | Published: April 29, 2022 5:13 PM

WhatsApp Multi-Device फिचरमध्ये नवीन आणि मोठा बदल केला जाणार आहे. गेले कित्येक दिवस याबाबत युजर्सच्या तक्रारी समोर येत होत्या.  

WhatsApp सुरु झाल्यापासून एका फिचरची मागणी केली जात होती, ते म्हणजे एकच अकाऊंट दोन डिवाइसमध्ये वापरण्याची. ही मागणी कंपनीनं ने काही दिवसांपूर्वी Android आणि iOS साठी मल्टी डिवाइस सपोर्ट सादर करून पूर्ण केली आहे. परंतु त्यात देखील व्हॉट्सअ‍ॅपनं एक महत्वाचं फिचर दिलं नाही, असं युजर्सनं म्हणणं आहे. युजर एक स्मार्टफोनसह आणखी तीन डिवाइसेज लिंक करू शकतात परंतु हे नवीन डिवाइस स्मार्टफोन असू शकत नाहीत. आता मेटा या नवीन फीचरवर काम करत आहे.  

WABetaInfo च्या रिपोर्टनुसार, व्हॉट्सअ‍ॅप आपल्या मल्टी डिवाइस फिचरमध्ये नवीन अपडेट घेऊन येत आहे. त्यामुळे आता युजर्स सेकंडरी स्मार्टफोन आणि टॅबलेटमध्ये देखील WhatsApp वापरू शकतील. व्हॉट्सअ‍ॅप बीटाच्या अँड्रॉइड व्हर्जन 2.22.10.13 मध्ये हे फीचर दिसलं आहे. रिपोर्टनुसार आता व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कम्पॅनियन डिवाइस रजिस्टर करण्याचा ‘Register Device as Companion’ असा ऑप्शन मिळेल.  

असं वापरता येईल हे फीचर 

मल्टी डिवाइस फिचर सर्वांसाठी उपलब्ध झालं असून सुद्धा स्मार्टफोन्स आणि टॅबलेटमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर नवीन डिवाइस लिंक करण्याचा पर्याय देण्यात आला नाही. परंतु नवीन अपडेट नंतर हे फीचर वापरण्यासाठी युजरला मुख्य डिवाइसमधील अ‍ॅपचा QR कोड स्कॅन करावा लागेल. त्यानंतर डिवाइस लिंक करण्याचा ऑप्शन मिळेल जिथे यात तुम्ही तुमचा कोणताही स्मार्टफोन किंवा टॅबलेट लिंक करू शकाल.  

रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की WhatsApp चं हे फीचर सध्या तरी डेव्हलपमेंट फेजमध्ये आहे. त्यामुळे Meta आपल्या इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅपमध्ये हे फीचर कधी घेऊन येईल, हे सध्या तरी सांगता येणार नाही.  

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान