Money Heist Season 5: WhatsApp ने सादर केले Money Heist स्टिकर पॅक; असे करा डाउनलोड
By सिद्धेश जाधव | Updated: September 4, 2021 16:48 IST2021-09-04T16:48:14+5:302021-09-04T16:48:51+5:30
Money Heist Season 5: WhatsApp ने Money Heist स्टिकर पॅक सादर केला आहे. स्टिकर सेक्शनमध्ये जाऊन हा पॅक डाउनलोड करता येईल.

Money Heist Season 5: WhatsApp ने सादर केले Money Heist स्टिकर पॅक; असे करा डाउनलोड
WhatsApp वर वेगवेगळ्या प्रसंगी नवनवीन स्टिकर पॅक सादर होत असतात. आता या लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅपवर नेटफ्लिक्सच्या प्रसिद्ध क्राईम सीरिज मनी हाईस्टवर आधारित स्टिकर्स उपल्बध झाले आहेत. या स्टिकर पॅकचे नाव ‘Sticker Heist’ असून अँड्रॉइड आणि आयओएस डिवाइस युजर्स हा स्टिकर पॅक वापरू शकतात. या अॅनिमेटेड स्टिकर पॅकची निर्मिती Mucho Pixels यांनी केली आहे, या पॅकमध्ये 17 स्टिकर्स आहेत आणि याची साईज फक्त 658KB आहे.
नेटफ्लिक्सच्या लोकप्रिय Money Heist सीरिजचा पाचवा हंगाम काल म्हणजे 3 सप्टेंबरला रिलीज करण्यात आला आहे. हा या हंगामाचा पहिला भाग आहे तर दुसऱ्या भागासाठी दर्शकांना डिसेंबरची वाट बघावी लागेल. पुढे आम्ही व्हॉट्सअॅपवरून मनी हाईस्ट स्टिकर्स कसे डाउनलोड करायचे याची संपूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
Money Heist Stickers व्हॉट्सअॅपवरून डाउनलोड करून पाठवण्यासाठी
- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोर किंवा अॅप्पल अॅप स्टोरवरून व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करून घ्या.
- त्यानंतर व्हॉट्सअॅपवर जाऊन कोणतीही चॅट विंडो ओपन करा.
- आता स्माइलीज आयकॉनवर क्लीक करून स्टिकर टॅब ओपन करा. तिथे तुमच्या स्टिकर लिस्टच्या शेवटला असलेल्या ‘+’ वर क्लीक करा.
- त्यानंतर समोर आलेल्या यादीत ‘Sticker Heist’ पॅक शोध. हा पॅक सर्वात वरच असेल, परंतु नसल्यास स्क्रोल करा.
- आता स्टिकर डाउनलोड करा आणि तुमच्या चॅटची रंगत वाढवा.
जर फक्त 17 स्टिकर्समधून तुम्हाला तुमच्या भावना व्यक्त करता येत नसतील तर तुम्ही अजून स्टिकर डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्ही गुगल प्ले स्टोर आणि अॅप्पल अॅप स्टोरवर जाऊन “Money Heist stickers for WhatsApp” असा सर्च करून तुमच्या आवडीचे स्टिकर अॅप डाउनलोड करू शकता.