WhatsApp चा भारतीय युजर्सना मोठा झटका; बॅन केले 20 लाखांपेक्षा जास्त अकॉउंट
By सिद्धेश जाधव | Updated: October 2, 2021 15:41 IST2021-10-02T15:41:03+5:302021-10-02T15:41:40+5:30
Whatsapp Banned Indian Users: व्हॉट्सअॅपच्या ताज्या रिपोर्टनुसार ऑगस्टमध्ये 20,70,000 भारतीयांच्या अकॉउंटसवर बंदी घालण्यात आली आहे.

WhatsApp चा भारतीय युजर्सना मोठा झटका; बॅन केले 20 लाखांपेक्षा जास्त अकॉउंट
व्हॉट्सअॅपने नवीन आयटी नियमांच्या अंतर्गत या महिन्यात 20 लाखांपेक्षा जास्त भारतीय अकॉउंट बॅन केले आहेत. ऑगस्टमध्ये कंपनीने 420 तक्रारींवर कारवाई करत हा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने आपल्या कम्प्लायन्स रिपोर्टमधून ही माहिती दिली आहे. याआधी व्हॉट्सअॅपने 16 जून ते 31 जुलैच्या कालावधीत 3,027,000 अकॉउंट बॅन केले होते.
20,70,000 भारतीय व्हॉट्सअॅप अकॉउंटस बॅन
लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग ऍप व्हॉट्सअॅपने ऑगस्टमध्ये 10 प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कन्टेन्टवर देखील कारवाई केली आहे. कंपनीने 3.17 कोटी फोटो, व्हिडीओज आणि मेसेजेसवर कारवाई केली आहे. व्हॉट्सअॅपच्या ताज्या रिपोर्टनुसार ऑगस्टमध्ये 20,70,000 भारतीयांच्या अकॉउंटसवर बंदी घालण्यात आली आहे.
WhatsApp बॅन मागील कारण
व्हट्सअॅपने याआधी सांगितले होते कि बॅन झालेल्या एकूण अकॉउंटस पैकी 95 टक्क्यांहून अधिक अकॉउंटस मर्यादेपेक्षा जास्त मसेजेस पाठवल्यामुळे बॅन केले जातात. दर महिन्यला कंपनी जगभरातून सरासरी 80 लाख अकॉउंट बॅन करते. बॅन केलेल्या युजर्सपैकी जास्तीत जास्त लोक ऑटोमेटड मेसेज, बल्क मेसेजिंग किंवा स्पॅम मेसेजचा अनधिकृतपणे वापर करत असतात.
जर युजर अश्लील, बेकायदेशीर, द्वेषपूर्ण, धमकावणारे आणि भीतीदायक मेसेज पाठवत असेल तर त्याचे अकॉउंट बॅन केले जाते, अशी माहिती कंपनीने दिली आहे. तसेच जर युजरने WhtasApp च्या टर्म्स अँड कंडीशनचे उल्लंघन केल्यावर देखील अकॉउंट बॅन होऊ शकते. जर तुम्हाला लोकप्रिय मेसेंजर व्हॉट्सअॅपचा वापर करायचा असेल तर वरील मेसेज पाठवणे टाळावे आणि नियमांचे पालन करावे.