WhatsApp Feature: मस्तच! 24 तासानंतर गायब होणार पाठवलेले WhatsApp मेसेज; अशाप्रकारे करा फिचर अॅक्टिव्हेट
By सिद्धेश जाधव | Updated: December 7, 2021 15:22 IST2021-12-07T15:22:12+5:302021-12-07T15:22:48+5:30
WhatsApp Feature: WhatsApp नं गेल्यावर्षी Disappearing Messages Feature सादर केलं होतं. हे फिचर पर्सनल आणि ग्रुप चॅट दोन्हींसाठी अॅक्टिव्हेट करता येतं. तुम्ही ठरविक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी हे फिचर अॅक्टिव्हेट करू शकता.

WhatsApp Feature: मस्तच! 24 तासानंतर गायब होणार पाठवलेले WhatsApp मेसेज; अशाप्रकारे करा फिचर अॅक्टिव्हेट
WhatsApp वरील डिसअपीयरिंग मेसेज फीचरमध्ये बदल करण्यात आला आहे. आता या फिचरमध्ये 24 तास ते 90 दिवसांपर्यंतचे ऑप्शन मिळतील. आतापर्यंत या फिचरमध्ये फक्त 7 दिवसांचा पर्याय मिळत होता, परंतु आता हे दोन नवीन पर्याय जोडण्यात आले आहेत. त्यामुळे या मोडचा वापर करून पाठवलेले मेसेजेस आता 24 तासांनी आपोआप डिलीट होतील.
कंपनीने गेल्यावर्षी Disappearing Messages Feature सादर केलं होतं. हे फिचर पर्सनल आणि ग्रुप चॅट दोन्हींसाठी अॅक्टिव्हेट करता येतं. तुम्ही ठरविक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुपसाठी हे फिचर अॅक्टिव्हेट करू शकता. या फीचरचा वापर करून पाठवलेले मेसेज आपोआप रिसिव्हरच्या आणि तुमच्या फोनमधून डिलीट होतील. सुरुवातीला फक्त 7 दिवसांची मर्यादा देण्यात आली होती. परंतु आता 24 तास आणि 90 दिवसांचा पर्याय देण्यात आला आहे. तसेच आता सर्व नवीन चॅटसाठी डिसअपीयरिंग मेसेज फीचर अगदी सुरुवातीपासून ऑन ठेवण्याचा पर्याय देखील मिळेल.
डिसअपीयरिंग मेसेज फीचर ऑन करण्यासाठी
- WhatsApp अॅपमध्ये हवा असलेला कॉन्टॅक्ट सर्च करा
- कॉन्टॅक्टच्या प्रोफाईल वर जा
- खाली स्क्रोल केल्यावर Disappearing Messages ऑप्शनवर टॅप करा.
- फीचर ऑन करा आणि 24 तास, 7 दिवस, 90 दिवसांपैकी एका पर्ययाची निवड करा.
- उपरोक्त स्टेप्स फोल्लो करून हे फिचर बंद देखील करता येतं.