शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

व्हाट्सअ‍ॅपवर येणार उपयुक्त फिचर; पाठविण्यापूर्वी ऐकता येणार व्हॉइस मेसेज  

By सिद्धेश जाधव | Published: June 05, 2021 6:32 PM

WhatsApp update: व्हाट्सअ‍ॅपने अलीकडेच व्हॉइस मेसेजेसचा वेग बदलण्याचा पर्याय दिला होता, आता लवकरच व्हॉइस मेसेज पाठविण्यापूर्वी ऐकता येतील.  

काही दिवसांपूर्वी व्हाट्सअ‍ॅपने नवीन फिचर जोडले होते, या फीचरमुळे आलेल्या व्हॉइस मेसेजेसचा वेग वाढवता येतो. मोठे व्हॉइस मेसेजेस ऐकताना हा फिचर खूप उपयोगी ठरतो. आता कंपनी व्हॉइस मेसेजसाठी अजून फिचर घेऊन येणार आहे, अशी बातमी आली आहे. हे फिचर देखील खूप उपयुक्त ठरणार आहे.  

अनेकदा आपण चुकून एखादा मेसेज पाठवतो, असे मेसेज डिलीट करण्याची सोय अ‍ॅपमध्ये आहे. परंतु, आता व्हाट्सअ‍ॅप तुम्हाला व्हॉइस मेसेजेस पाठविण्यापूर्वी ते ऐकण्याचा पर्याय देणार आहे. म्हणजे चुकून पाठविल्या जाणाऱ्या व्हॉइस मेसेजेसचे प्रमाण कमी होईल. या फिचरची चाचणी अँड्रॉइडवर केली जात आहे. WhatsApp अँड्रॉइड बीटा 2.21.12.7 मध्ये हे फिचर उपलब्ध झाले आहे. आयओएससाठी पण लवकरच हे फिचर येणार असल्याची माहिती WABetaInfo ने दिली आहे.  

व्हाट्सअ‍ॅपच्या अजून काही नव्या फीचर्सची माहिती WABetaInfo वेबसाइटच्या माध्यमातून समोर आली होती. यात व्हाट्सअ‍ॅप Multi Device Support, Disappearing Mode आणि View Once चा फीचरचा समावेश असेल.  

मल्टी डिवाइस सपोर्ट फिचर (Multi-Device Support Feature)  

एकच व्हाट्सअ‍ॅप नंबर अनेक फोन्समध्ये वापरता यावा अशी अनेकांची मागणी होती. Multi Device Support फीचरच्या माध्यमातून हि मागणी पूर्ण होऊ शकते. मिळालेल्या माहितीनुसार युजर त्यांचे व्हाट्सअ‍ॅप अकाउंट को एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरू शकतील. यापूर्वी एका स्मार्टफोनमधील व्हाट्सअ‍ॅप नंबरने दुसऱ्या फोनमध्ये लॉगिन केल्यावर जुन्या फोनवरील अकॉउंट बंद होत असे. एकापेक्षा जास्त फोन्स वापरणाऱ्या लोकांसाठी हे फिचर वरदान ठरणार आहे.   

डिसअपेरिंग मोड फिचर (Disappearing Mode Feature)  

Instagram वापरणाऱ्या लोकांना डिसअपेरिंग फीचरची माहिती असेलच. या फीचर अंतगर्त ठरविक वेळेत एखाद्या व्यक्तीला पाठवण्यात आलेले मेसेजेस आपोआप गायब होतात. हे फीचर आता लवकरच व्हाट्सअ‍ॅप युजर्सना पण मिळणार आहे.  

व्यू वन्स फिचर (View Once Feature)  

व्हाट्सअ‍ॅप व्यू वन्स फीचर देखील लवकरच रोलआउट होऊ शकते. या फिचरमध्ये पाठवलेला फोटो किंवा व्हिडीओ मेसेज मिळवणारा व्यक्ती फक्त एकदाच बघू शकतो. त्यानंतर तो फोटो किंवा व्हिडीओ पुन्हा बघता येत नाही. या फिचरविषयी अधिक माहिती समोर आली नाही.   

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञानAndroidअँड्रॉईड