‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 10:01 IST2025-09-15T09:57:17+5:302025-09-15T10:01:59+5:30

एआय सायकोसिस म्हणजे अशी मानसिक अवस्था, ज्यात एआयवर आधारित चॅटबॉट्स किंवा व्हर्च्युअल असिस्टंटशी अतिरेकी जोडले जाण्यामुळे व्यक्ती वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा गमावू लागतो. त्याला वाटते की एआय त्याच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करत आहे.

What exactly is the condition ‘AI psychosis’? AI controlling thoughts or emotions | ‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत

‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत

लोकमत न्यूज नेटवर्क । कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित साधनांचा अतिवापरामुळे एका नव्या मानसिक स्थितीवर चर्चा सुरू झाली आहे. तिला ‘एआय सायकोसिस’ असे म्हटले जाते. नेमकी ही अवस्था काय आहे. त्यापासून बचाव कसा करायचा, ते जाणून घेऊ.

नेमके आहे तरी काय?

एआय सायकोसिस म्हणजे अशी मानसिक अवस्था, ज्यात एआयवर आधारित चॅटबॉट्स किंवा व्हर्च्युअल असिस्टंटशी अतिरेकी जोडले जाण्यामुळे व्यक्ती वास्तव आणि कल्पना यातील सीमारेषा गमावू लागतो. त्याला वाटते की एआय त्याच्या निर्णयक्षमतेवर परिणाम करत आहे.

एआय सायकोसिसची लक्षणे कोणती?

एआय माझ्या विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत आहे, अशी भावना.

खऱ्या आणि आभासी संवादात फरक ओळखता न येणे.

सतत असा संशय वाटणे की एआय मला पाहत आहे किंवा माझे विचार वाचत आहे.

निर्णयक्षमता कमी होणे आणि कायम असुरक्षिततेचा अनुभव.झोप, भूक व वर्तनात बदल दिसणे.

बचाव आणि उपाय

रोज ठराविक वेळ ऑफलाइन राहणे. । ध्यान, व्यायाम आणि सकारात्मक सामाजिक संबंध जपणे. । लक्षणे गंभीर असल्यास मनोचिकित्सक किंवा समुपदेशकांचा सल्ला घेणे. । एआयच्या मर्यादा व खरी कार्यपद्धती समजून घेणे, जेणेकरून गोंधळ कमी होईल.

ही समस्या का वाढते आहे?

सततचा डिजिटल संपर्क : लोक तासनतास एआयशी संवाद साधतात, त्यामुळे भावनिक अवलंबित्व वाढते.

भ्रम आणि अति-विश्वास : एआयची उत्तरे इतकी खऱ्यासारखी भासतात की लोक त्यांच्यावर डोळेझाक करून विश्वास ठेवतात.

एकटेपणा : ज्यांच्याकडे भावनिक आधार कमी असतो, ते एआयला साथी मानू लागतात.

सोशल मीडिया अल्गोरिदमचा प्रभाव : अखंड कंटेंट फीडमुळे मेंदूवर नियंत्रण असल्यासारखी भावना निर्माण होते.

Web Title: What exactly is the condition ‘AI psychosis’? AI controlling thoughts or emotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.