Windows 10 वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; Microsoft ने बंद केले सिक्युरिटी अपडेट्स, काय करावे?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 12:45 IST2025-09-19T12:44:39+5:302025-09-19T12:45:09+5:30
Microsoft पुढील महिन्यापासून Windows 10 साठी सिक्युरिटी अपडेट देणे थांबवणार आहे.

Windows 10 वापरणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा; Microsoft ने बंद केले सिक्युरिटी अपडेट्स, काय करावे?
Windows 10 वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी समोर आहे. Microsoft पुढील महिन्यापासून Windows 10 साठी सिक्युरिटी अपडेट देणे थांबवणार आहे. 14 ऑक्टोबर 2025 पासून Windows 10 वर चालणाऱ्या पीसींना फ्री सिक्युरिटी अपडेट मिळणार नाहीत. म्हणजेच, त्यानंतर सिस्टिममध्ये काही त्रुटी आल्यास हॅकर्स किंवा सायबर हल्लेखोर त्याचा गैरफायदा घेऊ शकतात.
युजर्सची मागणी
Windows 10 चा फ्री सपोर्ट बंद झाल्यामुळे जगभरातील कोट्यवधी लोकांची डिजिटल सुरक्षा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे मायक्रोसॉफ्टने हा निर्णय परत घ्यावा, अशी मागणी सुरू झाली आहे. अमेरिकन ग्राहक संघटना कन्झ्युमर रिपोर्ट्सने म्हटले की, लाखो लोक अजूनही Windows 10 वापरत आहेत. अशा परिस्थितीत जर मायक्रोसॉफ्टने सपोर्ट थांबवला, तर या लोकांवर सायबर हल्ल्यांचा धोका वाढेल. ऑगस्ट 2025 पर्यंतच्या आकडेवारीनुसार जगातील 46% पेक्षा जास्त लोक अजूनही विंडोज 10 वापरत आहेत. यापैकी बहुतेक पीसी विंडोज 11 च्या गरजा पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे कंपनीने हा निर्णय मागे घेण्याची मागणी होत आहे.
युजर्ससाठी कोणते पर्याय उपलब्ध ?
या निर्णयामुळे प्रभावित झालेल्या लोकांसाठी मायक्रोसॉफ्टने काही पर्याय दिले आहेत:
पेड कव्हरेज - जे युजर्स Windows 10 सुरू ठेवू इच्छितात, ते 30 डॉलर (सुमारे ₹2,650) देऊन एका वर्षाचे कव्हरेज मिळवू शकतात. यामुळे त्यांना पुढील वर्षी ऑक्टोबरपर्यंत सुरक्षा मिळेल. तसेच, 1000 Microsoft Reward Points रिडीम करुनही एक वर्षाचे अतिरिक्त कव्हरेज घेता येईल.
वनड्राईव्ह बॅकअप - यातून युजर्सना मर्यादित कव्हरेज मिळेल.
विंडोज 11 अपग्रेड - युजर्ससाठी अंतिम व सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे Windows 11 मध्ये अपग्रेड करणे.