शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

वेगवान इंटरनेटची प्रतीक्षा कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2020 4:53 AM

आता ५-जीमुळे विविध उत्पादन आणि सेवाक्षेत्रातदेखील सुपरसॉनिक वेगाने कामे होण्यास मदत होणार आहे.

रशियाने नुकतीच रडारलाही चकवा देऊ शकणाऱ्या अतिवेगवान मिसाइलची चाचणी घेतली. आता ५-जीमुळे विविध उत्पादन आणि सेवाक्षेत्रातदेखील सुपरसॉनिक वेगाने कामे होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे केवळ मोबाइलसेवाच नव्हे, तर कृत्रिम बुद्धिमत्तादेखील (आर्र्टिफिशियल इंटिलिजन्स) आणखी तल्लख होणार आहे. भारतात मात्र, ही सेवा सक्षमपणे चालण्यासाठी आणखी वाट पाहावी लागणार असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.जगभरामधे ५-जी तंत्रज्ञानावरील चाचणी यशस्वी झाली असून, ती काही ठिकाणी प्रायोगिक स्तरावर त्याचा वापरही सुरू झाला आहे. आॅप्टिकल फायबरद्वारे सेवा घेतल्यास संगणकाचा वेग दहा गिगाबाइट (दहा हजार जीबी)पर्यंत जाईल. बँडविड्थ किती असेल, त्यावर हा वेग अवलंबून राहील. लॅपटॉपवर हा वेग चार ते पाच सेकंदांत मिळेल. सर्वोत्तम सेवा असलेल्या ठिकाणी मोबाइलवरदेखील ५ सेकंदापर्यंत हा स्पीड गाठता येईल.इंटरनेटचा वेग वाढल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य सेवा, गुंतागुंतीची शस्त्रक्रिया, संगीत, रोबोटिक्स, आॅटोमोबाइल क्षेत्र, इन्शुरन्स आणि इतर सेवा आणि उत्पादन क्षेत्रातदेखील आमूलाग्र बदल होतील. वाहनेदेखील अधिक स्मार्टपणे काम करतील. विशेषत: चारचाकी वाहनांमधील कृत्रिम बुद्धिमत्तेला चालना मिळेल. पुण्यातील फ्लेम इन्स्टिट्यूटमध्ये तर मानवी मदत न घेता, संगणकावर संगीतनिर्मिती करण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला. डॉ. विनोद विद्वंस यांनी संगणकीय प्रणाली विकसित केली आहे. रागाचे आरोह-अवरोह, वादी व संवादी स्वर दिले की, संगणक नवी बंदिश तयार करते. विशेष म्हणजे, यात कोणत्याही डाटाबेसचा वापर होत नाही.सायबरतज्ज्ञ रोहन न्यायाधीश म्हणाले की, सेवा, आॅटोमोबाइल, विमा, रोबोटिक्स अशा विविध क्षेत्रांत ५-जी तंत्रज्ञानामुळे गती येणार आहे. विक्रीपश्चात वाहनसेवा, विमा, आॅटोमोबाइल आणि आॅनलाइन विक्री करणाºया कंपन्यांमध्ये वापरल्या जाणाºया कृत्रिम बुद्धिमत्तेचा वेग यामुळे वाढेल. ग्राहकाची जास्तीतजास्त शंकांचे समाधान ही यंत्रणा करेल. कमीतकमी मानवी हस्तक्षेप असल्याने प्रणालीला वाव मिळेल.५-जी प्रणाली जगाच्या बाजारपेठेत येत असली, तरी ही सेवा भारतात मिळण्यास विलंब लागेल. आपल्याकडे त्यासाठीची यंत्रणाच अस्तित्वात नसल्याने मोबाइलवरील इंटरनेट५-जी क्षमतेचे होण्यास वेळ लागेल.- रोहन न्यायाधीश, सायबरतज्ज्ञ.सुप्रीम कोर्टाची या क्षेत्राविषयीची एकूणच भूमिका व कंपन्यांचा वाढता तोटा अशा गर्तेत टेलिकॉम उद्योग सापडला आहे. नवी गुंतवणूक मोबाइल क्षेत्रात होत नाही, पण चीनसह काही देशांत मात्र यंदा ५-जी येईल. - दीपक शिकारपूर, संगणकतज्ज्ञ.काय आहे ४जी-५जीहवेतून संदेशवहन करणारी वेगवान प्रणाली म्हणून ४-जीकडे पाहिले जाते. आता आपण ५-जीच्या उंबरठ्यावर आहोत. जगामध्ये २०२० मध्ये ५-जी सेवा येत आहे. अत्युच्च क्षमतेच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे फोरजी सेवा वेगवान झाली. सध्या सातशे ते अडीच हजार मेगाहटर््झवर ४-जी सेवा चालते.त्यामुळे कमीतकमी विलंबाने डाटा पोहोचणे आणि फाइल-व्हिडीओ डाउनलोड करण्याचा वेगही त्यामुळे कमी झाला. ४-जी सेवेमध्ये प्रतिचौरस किलोमीटरमधे ४ हजार वापरकर्त्यांना ४-जी सेवा उत्तम पद्धतीने देता येऊ शकत होती. ५-जीमुळे तब्बल एक दशलक्ष वापरकर्त्यांना ही सेवा देता येईल. एकाच ठिकाणी अधिक वापरकर्ते असल्यास मोबाइल इंटरनेटला तितका वेग मिळत नाही. ही अडचण दूर होईल. इंटरनेट वेगातही वाढ होईल.