लॉकडाउनमुळे रिचार्ज न करू शकणाऱ्यांना Vi कडून मिळणार मोफत रिचार्ज; अशाप्रकारे करा अॅक्टिव्हेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 13:40 IST2021-06-23T12:19:20+5:302021-06-23T13:40:21+5:30
Vi gives 75 Rs Plan for free: कोरोना महामारीमुळे रिचार्ज करू न शकणाऱ्या आणि कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना वोडाफोन आयडिया 75 रुपयांचा प्लॅन मोफत देत आहे.

या नवीन ऑफरअंतगर्त ग्राहकांना Vi ते Vi नेटवर्कवर कॉलिंगसाठी 50 मिनिटे मोफत मिळतील.
वोडाफोन आयडियाने (Vi) ने कोविड-19 रिलीफ ऑफरअंतगर्त आपल्या कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांना मोफत कॉलिंग आणि डेटा देण्याची घोषणा केली आहे. कंपनी ग्राहकांना मोफत 75 रुपयांचा रिचार्ज देत आहे. लॉकडाउनमुळे अनेक Vi ग्राहकांना रिचार्ज करायला जमत नाही, त्यामुळे कंपनीने पुन्हा एकदा या ऑफरची घोषणा केली आहे. (Vodafone idea offers free plan of 75rs to low-income groups)
Vi ची मोफत ऑफर
या नवीन ऑफरअंतगर्त ग्राहकांना Vi ते Vi नेटवर्कवर कॉलिंगसाठी 50 मिनिटे मोफत मिळतील. तसेच युजर्सना 50MB डेटा देखील मोफत देण्यात येईल. हा प्लॅन 15 दिवस वैध असेल. जे ग्राहक लॉकडाउनमुळे रिचार्ज करू शकत नाहीत त्यांच्यासाठी कंपनीने या प्लॅनची घोषणा केली आहे. या Vi ने आपल्या या ऑफरला Unlock 2.0 Benefit असे नाव दिले आहे.
कसा मिळेल मोफत रिचार्ज
तुम्ही या मोफत रिचार्जसाठी पात्र आहात कि नाही हे जाणून घेण्यासाठी वोडाफोन आयडिया ग्राहकांना USSD कोड 44475# डायल करावा लागेल. तसेच 121153 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून देखील तुम्ही तुमची पात्रता बघू शकता. त्याचबरोबर कंपनी आपल्या ग्राहकांना मेसेजच्या माध्यमातून या ऑफरची माहिती देत आहे. तुम्ही तुमच्या जवळच्या वोडाफोन आयडिया स्टोरवर जाऊन देखील या ऑफरची संपूर्ण माहिती घेऊ शकता.
काही दिवसांपूर्वी कंपनीने कमी उत्पन्न असलेल्या ग्राहकांसाठी 49 आणि 79 रुपयांचे दोन प्लॅन सादर केले होते. यातील 49 रुपयांचा प्लॅन मोफत देण्यात आला होता तर 79 रुपयांच्या प्लॅनमधील फायदे दुप्पट करण्यात आले होते.