Vi च्या ग्राहकांना मिळणार ‘या’ पोर्टलवरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य; सरकारी नोकरीची तयारी देखील Vi अॅपवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 15:34 IST2022-04-07T15:33:18+5:302022-04-07T15:34:57+5:30
Vodafone Idea च्या नव्या Vi Jobs and Education फिचरच्या मदतीनं कंपनीचे ग्राहक नोकरी शोधू शकतील, तसेच नोकरीसाठी आवश्यक ती तयारी देखील करता येईल.

Vi च्या ग्राहकांना मिळणार ‘या’ पोर्टलवरील नोकऱ्यांमध्ये प्राधान्य; सरकारी नोकरीची तयारी देखील Vi अॅपवर
एकीकडे अन्य टेलिकॉम कंपन्या ग्राहकांच्या करमणुकीसाठी ओटीटी प्लॅटफॉर्म्स सोबत भागेदारी करत आहेत. तर Vodafone Idea नं आपलं लक्ष तरुणाईकडे वळवलं आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीनं Vi Games फिचरच्या माध्यमातून ग्राहकांच्या फावल्या वेळेची सोय केली होती. आता कंपनी Vi Jobs and Education च्या माध्यमातून तरुणांना नोकरी शोधण्यात आणि सरकारी नोकरीची तयारी करण्यात मदत करणार आहे.
Vi Jobs and Education हे फिचर कंपनीच्या Vi अॅपमध्ये उपलब्ध झालं आहे. ज्याच्या माध्यमातून कंपनी भारतातील त्या प्रीपेड ग्राहकांना लक्ष्य करत आहे जे नोकरी शोधत आहेत, चांगली नोकरी मिळावी यासाठी इंग्रजी सुधारत आहेत किंवा सरकारी नोकरीसाठी परीक्षा देत आहेत. यासाठी कंपनीनं या क्षेत्रातील मोठ्या स्टार्टअप्स सोबत भागेदारी केली आहे.
कंपनीनं देशातील सर्वात मोठ्या जॉब सर्च प्लॅटफॉर्म Apna सोबत भागेदारी केली आहे. युजर्सचं इंग्रजी सुधारण्यासाठी इंग्लिश लर्निंग प्लॅटफॉर्म Enguru ची मदत घेण्यात आली आहे. तर Pariksha अॅपच्या माध्यमातून वोडाफोन आयडियाचे ग्राहक सरकारी नोकरीची तयारी करू शकतील. यांच्या सेवा काही दिवस मोफत देण्यात येतील आणि त्यानंतर देखील सवलतीच्या दरात सेवा मिळत राहतील.
Enguru इंग्रजीवर प्रभुत्व मिळण्यासाठी मदत करेल. या अॅपची 14 दिवसाचं ट्रायल क्लास अनलिमिटेड एक्सपर्ट्ससह इंटरैक्टिव लाईव्ह क्लासेस ग्राहकांना मिळतील. त्यानंतर 15 ते 20 टक्के डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना 1500 रुपयांचा इंडस्ट्री स्पेसिफिक सेल्फ लर्निंग मॉड्यूल देखील दिला जाईल.
सरकारी नोकरीची तयारी करण्यासाठी Pariksha ऍपचं एका महिन्याचं सब्सक्रिप्शन मोफत मिळेल. ज्यात 150 पेक्षा जास्त परीक्षांसाठी अनलिमिटेड मॉक टेस्ट उपलब्ध असतील. महिनाभरानंतर फक्त 249 रुपये देऊन तयारी सुरु ठेवता येईल.
जॉब सर्च प्लॅटफॉर्म Apna ची सेवा मात्र विनामूल्य वापरता येईल. या प्लॅटफॉर्मवर Vi च्या ग्राहकांना प्राधान्य देण्यात येईल आणि त्यामुळे कंपन्यांना तुमचं प्रोफाइल दिसण्याची शक्यता दुप्पट होईल.