विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:10 PM2021-10-21T19:10:44+5:302021-10-21T19:12:28+5:30

New Vivo Phone Vivo Y71t 5G Price In India: विवोने आपला नवीन 5G Phone चीनमध्ये Vivo Y71t नावाने सादर केला आहे. हा फोन लवकरच भारतात देखील दाखल होऊ शकतो.

Vivo y71t launched with dimensity 810 soc 64mp camera 4000mah battery and 44w fast charging  | विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग  

विवोचा ढासू Vivo Y71t स्मार्टफोन आला ग्राहकांच्या भेटीला; मिळणार 64MP कॅमेरा आणि 44W फास्ट चार्जिंग  

Next

विवोने आपल्या Y-series चा विस्तार करत Vivo Y71t स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने हा मिड रेंज डिवाइस चीनमध्ये सादर केला आहे. ज्यात MediaTek Dimensity 810 SoC, 64MP Cmaera, 4000mAh Battery आणि 44W Fast Charging असे शानदार स्पेक्स देण्यात आले आहेत. हा फोन लवकरच भारतात देखील सादर केला जाऊ शकतो.  

Vivo Y71t चे स्पेसिफिकेशन्स  

विवोचा हा फोन MediaTek Dimensity 810 SoC चिपसेट आणि Mali-G57 GPU सह सादर करण्यात आला आहे. Vivo Y71t स्मार्टफोन Android वर आधारित OriginOS 1.0 वर चालतो. यात ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा 64MP चा आहे आणि सेकंडरी कॅमेरा 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आहे. फोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो. 

Vivo Y71t स्मार्टफोन 6.44-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्ले रिजोल्यूशन Full HD+ आहे आणि रिफ्रेश रेट स्टँडर्ड ठेवण्यात आला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या ड्युअल सिम फोनमध्ये 5G, 4G VoLTE, Wi-Fi 5, Bluetooth v5.1, GPS, 3.5mm ऑडियो जॅक आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे. पॉवर बॅकअपसाठी या फोनमध्ये 4000mAh ची बॅटरी आणि 44W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.  

Vivo Y71t ची किंमत 

Vivo Y71t स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट चीनमध्ये उपलब्ध झाले आहेत. यातील छोटा व्हेरिएंट 8GB RAM आणि 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो, ज्याची किंमत 1,799 युआन (सुमारे 21,000 रुपये) आहे. तर मोठ्या 8GB RAM आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1,999 युआन (सुमारे 23,400 रुपये) ठेवण्यात आली आहे. 

Web Title: Vivo y71t launched with dimensity 810 soc 64mp camera 4000mah battery and 44w fast charging 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app