Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 19:56 IST2025-08-05T19:55:41+5:302025-08-05T19:56:53+5:30

Vivo Y400 5G Launched In India: कमी किंमतीत चांगले फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. 

Vivo Y400 5G smartphone with 6000 mAh battery, 50MP camera and AI features launched in India: Price, offers and more | Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!

Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!

२५ हजारांपेक्षा कमी किंमतीत दमदार फीचर्स असलेल्या फोनच्या शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. स्मार्टफोन निर्माता विवो कंपनीने नुकताच विवो व्हाय ४०० 5G भारतात लॉन्च केला आहे. या फोनमध्ये ग्राहकांना मोठा डिस्प्ले, दिर्घकाळ टीकणारी बॅटरीसह बरेच फीचर्स मिळत आहेत. 

विवो व्हाय ४०० 5G (८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज) स्मार्टफोनची सुरुवाती किंमत २१ हजार ९९९ रुपये आहे आणि ८ जीबी रॅम आणि २५६ स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २३ हजार ९९९ रुपये आहे. हा फोन ग्लॅम व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन अशा दोन रंगात लॉन्च करण्यात आला आहे. येत्या ७ ऑगस्टपासून हा फोन विवो इंडिया ई-स्टोअरसह फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि निवडक ऑफलाइन रिटेलर्सद्वारे विक्रीसाठी उपलब्ध होईल.

विवो व्हाय ४०० 5G: डिस्प्ले

विवो व्हाय ४०० 5G मध्ये १२०Hz रिफ्रेश रेट आणि १,८०० nits पर्यंत पीक ब्राइटनेससह ६.६७ इंचाचा फुल-एचडी+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. शिवाय, बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

विवो व्हाय ४०० 5G: कॅमेरा

या फोनमध्ये ग्राहकांना ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये ५०-मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ३२ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळत आहे. 

विवो व्हाय ४०० 5G: बॅटरी

फोनमध्ये ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी ९० वॅट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनची बॅटरी दिर्घकाळ टीकेल, असाही कंपनीकडून दावा करण्यात आला आहे.

विवो व्हाय ४०० 5G: बँक ऑफर

एसबीआय, डीबीएस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक, येस बँक, बीओबी कार्ड आणि फेडरल बँक कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना प्री-बुकिंग ऑफरमध्ये १० टक्क्यांपर्यंत कॅशबॅक दिले जाणार आहे. हा फोन १० महिन्यापर्यंत झिरो डाउन पेमेंट ईएमआय प्लॅनसह खरेदी केला जाऊ शकतो.

Web Title: Vivo Y400 5G smartphone with 6000 mAh battery, 50MP camera and AI features launched in India: Price, offers and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.