शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

भन्नाट! मोबाईलमध्येही आता व्हर्च्युअल रॅम फिचर; गरज पडताच वापरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 15:05 IST

Virtual RAM feature in Smartphone: कॉम्प्युटरला असलेली फिजिकल रॅम अपुरी पडत असेल तर त्याजागी हार्डडिस्क किंवा पेनड्राईव्हद्वारे व्हर्च्युअल रॅम वाढविण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. आता ते फिचर मोबाईलमध्ये देखील आले आहे.

चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारच नाही तर अवघे जग व्यापून टाकले आहे. या कंपन्यांना दोनच कंपन्या टक्कर देत आहेत. त्या म्हणजे अॅपल आणि सॅमसंग. बाकी सगळीकडे शाओमी, वनप्लस, ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्य़ांचा बोलबाला आहे. कारण त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान धडाधड उपलबद्ध करून दिले आहे. आता मोबाईलमध्ये देखील कॉम्प्युटर सारखी व्हर्च्युअल रॅम (Virtual RAM) वाढविता येणार आहे. (Vivo X60 smartphones to feature Virtual RAM)

कॉम्प्युटरला असलेली फिजिकल रॅम अपुरी पडत असेल तर त्याजागी हार्डडिस्क किंवा पेनड्राईव्हद्वारे व्हर्च्युअल रॅम वाढविण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. व्हायचे असे की, आपण जी सॉफ्टवेअर वापरायचो ती अपडेट होत जायची, याचबरोबर त्यांची साईज वाढण्यासोबत त्यांची काम करण्याची जागाही म्हणजेच रॅमही जास्त लागायची. परंतू कॉम्प्युटर जुनाच असल्याने त्यावर ते स्लो होऊन जायचे. यातून सुटण्यासाठी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय आला होता. 

आता असाच पर्याय स्मार्टफोनमध्ये आला आहे. व्हिवो आणि वनप्लस कंपनीने नुकतेच फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo X60 Pro मध्ये 12 जीबी आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. म्हणजेच 12 जीबी नेहमीची रॅम आहेच परंतू मोठमोठे गेम खेळताना दरज भासल्यास ही रॅम आणखी 3 जीबींनी वाढविता येणार आहे. यासाठी स्टोरेज स्पेसची जागा वापरली जाणार आहे. याचबरोबर OnePlus 9 मध्ये देखील हे व्हर्च्युअल रॅमचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे पुढील काळातही अन्य कंपन्या हे फिचर देण्याची शक्यता आहे. 

व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय? मोबाईलची किंवा कॉम्प्युटरची रॅम ही खूप फास्ट असते.  म्हणजेच तिचा रायटिंग स्पीड खूप असतो. कॉम्प्युटरला तर जुन्या काळात 56 एमबीपासून ते आता 10-12 जीबीची रॅम असते. जेवढी रॅम जास्त तेवढा वेग जास्त असे समीकरण असते. मोठमोठी सॉफ्टवेअर चालण्यासाठी या रॅमचा वापर होतो. ही रॅम टेम्पररी असते. एकदा वापर झाल्यावर काही क्षणांतच दुसरे काम त्याद्वारे केले जाते. ही रॅम वाढविण्यासाठी पेन ड्राईव्ह किंवा हार्डडिस्कचा काही भाग वापरला जातो. मेमरी मॅनेजमेंटद्वारे ही वाढविलेली रॅम म्हणजेच व्हर्च्युअल रॅम असते. ती कायमस्वरुपी रॅम नसते, ती आभासी असते. वेगवान प्रोसेस होण्यासाठी ही जागा वापरली जाते.

टॅग्स :VivoविवोOneplus mobileवनप्लस मोबाईल