भन्नाट! मोबाईलमध्येही आता व्हर्च्युअल रॅम फिचर; गरज पडताच वापरता येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 03:01 PM2021-03-25T15:01:29+5:302021-03-25T15:05:51+5:30

Virtual RAM feature in Smartphone: कॉम्प्युटरला असलेली फिजिकल रॅम अपुरी पडत असेल तर त्याजागी हार्डडिस्क किंवा पेनड्राईव्हद्वारे व्हर्च्युअल रॅम वाढविण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. आता ते फिचर मोबाईलमध्ये देखील आले आहे.

Vivo X60 Pro, Oneplus 9 gets Virtual RAM feature; other mobile company launch soon | भन्नाट! मोबाईलमध्येही आता व्हर्च्युअल रॅम फिचर; गरज पडताच वापरता येणार

भन्नाट! मोबाईलमध्येही आता व्हर्च्युअल रॅम फिचर; गरज पडताच वापरता येणार

googlenewsNext

चीनच्या स्मार्टफोन कंपन्यांनी भारतीय बाजारच नाही तर अवघे जग व्यापून टाकले आहे. या कंपन्यांना दोनच कंपन्या टक्कर देत आहेत. त्या म्हणजे अॅपल आणि सॅमसंग. बाकी सगळीकडे शाओमी, वनप्लस, ओप्पो, व्हिवोसारख्या कंपन्य़ांचा बोलबाला आहे. कारण त्यांनी नवनवीन तंत्रज्ञान धडाधड उपलबद्ध करून दिले आहे. आता मोबाईलमध्ये देखील कॉम्प्युटर सारखी व्हर्च्युअल रॅम (Virtual RAM) वाढविता येणार आहे. (Vivo X60 smartphones to feature Virtual RAM)


कॉम्प्युटरला असलेली फिजिकल रॅम अपुरी पडत असेल तर त्याजागी हार्डडिस्क किंवा पेनड्राईव्हद्वारे व्हर्च्युअल रॅम वाढविण्याचा पर्याय गेल्या अनेक वर्षांपासून उपलब्ध आहे. व्हायचे असे की, आपण जी सॉफ्टवेअर वापरायचो ती अपडेट होत जायची, याचबरोबर त्यांची साईज वाढण्यासोबत त्यांची काम करण्याची जागाही म्हणजेच रॅमही जास्त लागायची. परंतू कॉम्प्युटर जुनाच असल्याने त्यावर ते स्लो होऊन जायचे. यातून सुटण्यासाठी व्हर्च्युअल रॅमचा पर्याय आला होता. 


आता असाच पर्याय स्मार्टफोनमध्ये आला आहे. व्हिवो आणि वनप्लस कंपनीने नुकतेच फ्लॅगशिप स्मार्टफोन लाँच केले आहेत. Vivo X60 Pro मध्ये 12 जीबी आणि 3 जीबी रॅम देण्यात आली आहे. म्हणजेच 12 जीबी नेहमीची रॅम आहेच परंतू मोठमोठे गेम खेळताना दरज भासल्यास ही रॅम आणखी 3 जीबींनी वाढविता येणार आहे. यासाठी स्टोरेज स्पेसची जागा वापरली जाणार आहे. याचबरोबर OnePlus 9 मध्ये देखील हे व्हर्च्युअल रॅमचे फिचर देण्यात आले आहे. यामुळे पुढील काळातही अन्य कंपन्या हे फिचर देण्याची शक्यता आहे. 


व्हर्च्युअल रॅम म्हणजे काय? 
मोबाईलची किंवा कॉम्प्युटरची रॅम ही खूप फास्ट असते.  म्हणजेच तिचा रायटिंग स्पीड खूप असतो. कॉम्प्युटरला तर जुन्या काळात 56 एमबीपासून ते आता 10-12 जीबीची रॅम असते. जेवढी रॅम जास्त तेवढा वेग जास्त असे समीकरण असते. मोठमोठी सॉफ्टवेअर चालण्यासाठी या रॅमचा वापर होतो. ही रॅम टेम्पररी असते. एकदा वापर झाल्यावर काही क्षणांतच दुसरे काम त्याद्वारे केले जाते. ही रॅम वाढविण्यासाठी पेन ड्राईव्ह किंवा हार्डडिस्कचा काही भाग वापरला जातो. मेमरी मॅनेजमेंटद्वारे ही वाढविलेली रॅम म्हणजेच व्हर्च्युअल रॅम असते. ती कायमस्वरुपी रॅम नसते, ती आभासी असते. वेगवान प्रोसेस होण्यासाठी ही जागा वापरली जाते.

Web Title: Vivo X60 Pro, Oneplus 9 gets Virtual RAM feature; other mobile company launch soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.