Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 14:53 IST2025-07-14T14:50:47+5:302025-07-14T14:53:54+5:30

Vivo X200 FE 5G Launched: स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोन विवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला.

Vivo X200 FE 5G launched: Price in India, specifications, and more | Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!

स्मार्टफोन निर्माता कंपनी विवोने त्यांचा नवा स्मार्टफोनविवो एक्स २०० एफई 5G बाजारात लॉन्च केला. हा फोन काही दिवसांपूर्वी तैवानमध्ये सादर करण्यात आला होता.  या फोनमध्ये ६ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली दमदार बॅटरी आणि उत्कृष्ट कॅमेरा मिळत आहे. हा फोन थेट अॅपल, सॅमसंग आणि गुगल सारख्या ब्रँडच्या फ्लॅगशिप फोनशी स्पर्धा करेल, असा कंपनीचा दावा आहे. शिवाय, कंपनीने त्यांचा फोल्डेबल फोन विवो एक्स फोल्ड ५ देखील लॉन्च केला आहे.

विवो एक्स २०० एफई 5G हा फोन दोन व्हेरिएंटमध्ये (१२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज/ १६ जीबी रॅम + ५१२ जीबी स्टोरेज) लॉन्च करण्यात आला. या फोनची सुरुवाती किंमत ५४ हजार ९९९ रुपये इतकी आहे. तर, टॉप व्हेरिएंट ५९ हजार ९९९ रुपयांत खरेदी करता येईल. या फोनची पहिली विक्री २३ जुलै रोजी सुरू होईल. ग्राहक ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट तसेच कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि रिटेल स्टोअर्सवरून हा फोन खरेदी करू शकतात. या फोनच्या खरेदीवर ग्राहकांना ६,००० रुपयांची सूट दिली जाणार आहे.

विवो एक्स २०० एफई 5G: डिस्प्ले
विवो एक्स २०० एफई 5G मध्ये  ६.३१-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, जो १२०Hz हाय रिफ्रेश रेट फीचरला सपोर्ट करतो. डिस्प्लेची पीक ब्राईटनेस ५००० निट्स इतकी आहे. हा फोन MediaTek Dimensity ९३००+ प्रोसेसरवर काम करतो. 

विवो एक्स २०० एफई 5G: कॅमेरा
या फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा अल्ट्रा- वाइड कॅमेऱ्याचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

विवो एक्स २०० एफई 5G: बॅटरी
विवो एक्स २०० एफई 5G मध्ये ६ हजार ५०० एमएएच क्षमता असलेली दमदार बॅटरी असेल, जी ९० वॅट वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. त्यामुळे हा फोन लवकर चार्ज होईल आणि वापरकर्त्यांचा वेळ वाचवेल.

विवो एक्स २०० एफई 5G: कनेक्टिव्हिटी
या विवो फोनमध्ये ड्युअल ५जी सिम कार्ड, ब्लूटूथ ५.४, एनएफसी, यूएसबी टाइप सी सारखे फीचर्स आहेत. हा फोन ईसिम आणि फिजिकल सिम कार्ड सपोर्टसह येतो.

Web Title: Vivo X200 FE 5G launched: Price in India, specifications, and more

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.