Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात 

By सिद्धेश जाधव | Updated: March 16, 2022 12:11 IST2022-03-16T12:10:52+5:302022-03-16T12:11:01+5:30

Vivo Smartphone Price Cut: Vivo Y73, Vivo V21e आणि Vivo V21 स्मार्टफोनच्या किंमती कंपनीनं कायमच्या कमी केल्या आहेत.  

Vivo Cuts Price Of Vivo Y73 Vivo V21e And Vivo V21 Smartphone By Up To Rs 2000  | Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात 

Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात 

Vivo च्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. कंपनीनं आपल्या तीन स्मार्टफोन्सच्या किंमतीत 2000 रुपयांपर्यांतची कपात केली आहे. Vivo Y73, Vivo V21e आणि Vivo V21 स्मार्टफोनच्या किंमती कायमस्वरूपी कमी करण्यात आल्या आहेत. या नवीन किंमती 15 मार्चपासून लागू झाल्या आहेत, अशी माहिती 91mobiles नं दिली आहे. तसेच कंपनीच्या वेबसाईटवर देखील फोन अपडेटसह लिस्ट झाले आहेत.  

Vivo Y73 ची नवीन किंमत 

Vivo Y73 स्मार्टफोनच्या 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे 20,990 रुपयांचा हा फोन आता 19,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Vivo V21e ची नवीन किंमत 

Vivo V21e स्मार्टफोनच्या किंमतीत देखील 1000 रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे V21e स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB व्हेरिएंट आधी 24,990 रुपयांमध्ये विकला जात होता, परंतु हा फोन आता 23,990 रुपयांमध्ये विकत घेता येईल. 

Vivo V21 नवीन किंमत 

Vivo V21 स्मार्टफोनच्या दोन्ही व्हेरिएंटच्या किंमतीत दोन हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे 29,990 रुपयांचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेल आता 27,990 रुपयांना मिळेल. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 32,990 रुपयांच्या ऐवजी 30,990 रुपये मोजावे लागतील.  

Web Title: Vivo Cuts Price Of Vivo Y73 Vivo V21e And Vivo V21 Smartphone By Up To Rs 2000