शहरं
Join us  
Trending Stories
1
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
2
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
3
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
4
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
5
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
6
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
7
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
8
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
9
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
10
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
11
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
12
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
13
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
14
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
15
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
16
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
17
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
18
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
19
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
20
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

WhatsApp वर चॅटचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही; 'हे' आहे कारण 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2019 3:25 PM

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग मजेशीर व्हावं यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप सध्या आणखा एका नव्या फिचरवर काम करत आहे.

ठळक मुद्दे फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर असं या नव्या फीचरचं नाव असून काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप या फीचरवर काम करत आहे.फंक्शन सुरू झाल्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन एनेबल केल्यानंतर युजर्स चॅटचे स्क्रिनशॉट घेऊ शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅप 2.19.106 बीटा व्हर्जन अपडेट झाल्यानंतर मीडिया फाइल शेअरिंगसाठी वेगळा इंटरफेस मिळणार आहे.

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्सचं चॅटींग मजेशीर व्हावं यासाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅप सध्या आणखा एका नव्या फिचरवर काम करत आहे. मात्र या फीचर नंतर युजर्सना चॅटचे स्क्रीनशॉट काढता येणार नाहीत. फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर असं या नव्या फीचरचं नाव असून काही दिवसांपासून व्हॉट्सअ‍ॅप या फीचरवर काम करत आहे. लवकरच हे फीचर अ‍ॅपमध्ये येण्याची शक्यता आहे. आयओएस अ‍ॅपमध्ये फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचर पहिल्यापासून उपलब्ध आहे.

WABetaInfo दिलेल्या माहितीनुसार, व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉईडवर बीटा व्हर्जन अपडेट करणार आहे. या अपडेटनंतर युजर्सना चॅटचे स्क्रीनशॉट घेता येणार नाही. काही दिवसांपासून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन फीचरवर काम सुरू आहे. ऑथेंटिकेशनमध्ये एक नवीन फंक्शन आणणार आहेत. त्याच्यामुळे युजर्सला स्क्रीनशॉट घेता येणार नाही. एकदा हे फंक्शन सुरू झाल्यानंतर फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन अनेबल केल्यानंतर युजर्स चॅटचे स्क्रिनशॉट घेऊ शकत नाही. मात्र, ज्या व्हॉट्सअ‍ॅप युजर्सने फिंगरप्रिंट्स अनेबल केले नसेल तर स्क्रिनशॉट काढता येणार आहेत. व्हॉट्सअ‍ॅप 2.19.106 बीटा व्हर्जन अपडेट झाल्यानंतर मीडिया फाइल शेअरिंगसाठी वेगळा इंटरफेस मिळणार आहे. त्यामध्ये इमोजी आणि स्टीकर्ससाठी दोन नवीन स्वतंत्र टॅब असणार आहेत. त्याशिवाय, इन्स्टाग्रामसारखे वेळ, लोकेशन आणि अन्य स्टीकर्स दिसणार आहेत. 

WhatsApp वर आलं 'इग्नोर आर्काइव्ह चॅट्स' फीचर, जाणून घ्या खासियत 

...तर तुमचं WhatsApp अकाऊंट होणार ब्लॉक

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडिया साईट्स आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक नवनवीन बदल करत आहे. फेक न्यूज किंवा तेढ निर्माण करणाऱ्या मेसेजला आळा घालण्यासाठी सोशल मीडिया कठोर पावलं उचलत आहे. व्हॉट्सअ‍ॅपनेही  काही फोन नंबर ब्लॉक केले आहे. तसेच काही युजर्सचे चॅट फीचरही बंद केले आहे. चार मुख्य कारणांमुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे फोन नंबर ब्लॉक केले असल्याची माहिती समोर आली आहे. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

चॅटींगची गंमत वाढणार; आता लँडलाईन नंबरवरही WhatsApp चालणार

व्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर आणत असतं. पण तुम्हाला माहित आहे का? WhatsApp आता लँडलाईन नंबरवरही चालणार आहे. युजर्स आपल्या लँडलाईन नंबरसोबत आपल्याला हवं असल्यास व्हॉट्सअ‍ॅप कनेक्ट करू शकतात यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर कोणासोबत शेअर करण्याचीही गरज लागणार नाही व्हॉट्सअ‍ॅपच्या या फीचरचा फायदा हा WhatsApp Business App युजर्सना अधिक होणार आहे. या फीचरच्या मदतीने व्यावसायिक आपल्या लँडलाईन नंबरवरून आरामात व्हॉट्सअ‍ॅप  ऑपरेट करू शकतात. तसेच या फीचरचं वैशिष्ट्य म्हणजे युजर्सचा पर्सनल मोबाईल नंबर तुम्हाला नको असलेल्या लोकांसोबत शेअर करता येत नाही. 

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल 

असा तपासा व्हॉट्सअ‍ॅपवर येणारा फेक मॅसेज

निवडणुकीचा हंगाम, आरोग्य आणि इतर अनेक गोष्टींवर सकाळ संध्याकाळ व्हॉट्सअ‍ॅपवर मॅसेज येत असतात. जवळच्या व्यक्तीने पाठविला असल्याने आपण त्यावर लगेचच विश्वास ठेवतो. जरा थांबा. कशावरून त्या व्यक्तीने तो मॅसेज वाचूनच पुढे पाठविला असेल. खोटा मॅसेज परविणाऱ्याचे हेतू वेगवेगळे असतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅपने हे मॅसेज खरे की खोटे हे करण्यासाठी नुकतेच एक टूल लाँच केले आहे. यास 'Checkpoint Tipline' अस नाव दिले आहे. PROTO या भारतीय मीडिया स्टार्टअप कंपनीने हे टूल विकसित केले आहे. PROTO ही कंपनी निवडणूक काळात पसरविले जाणार मॅसेज त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी काही संस्थांच्या शोधात आहे. अशा मॅसेजचा शोध लागल्यास त्याद्वारे होणाऱ्या दंगली, अफवा थांबविण्यात यश येणार आहे.

WhatsApp वर आलं नवं फीचर, मेसेज कितीवेळा फॉरवर्ड झाला हे समजणार

काही महिन्यांपूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने फॉरवर्ड मेसेजवर मर्यादा आणली होती. मात्र आता त्यामध्ये बदल करत व्हॉट्सअ‍ॅपने एक नवीन फीचर आणलं आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या या नव्या फीचरमध्ये 'Forwarding Info' आणि 'Frequently Forwarded' यांचा समावेश करण्यात आला आहे. यातील फॉरवर्डिंग इन्फोमुळं मेसेज कितीवेळा फॉरवर्ड केला आहे याची माहिती मिळणार आहे. WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने हे नवे फीचर iOS आणि अ‍ॅन्ड्रॉईडच्या बीटा व्हर्जनवर लाँच केले आहे. iOS बीटा 2.19.40.23 आणि Android बीटा 2.19.86 व्हर्जनवर हे अपडेट दिसणार आहे.

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणार

व्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान