शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

झटपट, पटापट! स्मार्टफोन, इंटरनेट नसेल तरी नो टेन्शन; 'हा' नंबर डायल, काही सेकंदात UPI पेमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2025 13:55 IST

तुम्ही इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन नसला तरीही UPI पेमेंट करू शकता.

आजकल UPI पेमेंट आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. ऑनलाईन शॉपिंग असो किंवा किराणा मालाची खरेदी, प्रत्येक कामासाठी लोक UPI चा वापर करतात. फक्त एक पिन टाकून काही सेकंदात डिजिटल पेमेंट पूर्ण होतं. मात्र, अनेकदा कमी नेटवर्कमुळे इंटरनेट चालत नाही किंवा डेटा संपतो, अशा वेळी युजर्सची मोठी अडचण होते. जर तुम्हीही कधी अशा परिस्थितीत अडकलात, तर काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही इंटरनेटशिवाय आणि स्मार्टफोन नसला तरीही UPI पेमेंट करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या फोनवरून फक्त एक खास कोड *99# डायल करावा लागेल. चला तर मग जाणून घेऊया याची संपूर्ण पद्धत.

ज्या ठिकाणी इंटरनेट नाही, तिथेही तुम्ही UPI पेमेंट करू शकता. अगदी साध्या फीचर फोनवरून (बटणचा फोन) पेमेंट करणं शक्य आहे. मात्र यासाठी काही गोष्टी आवश्यक आहेत: तुमच्या फोनला मोबाईल नेटवर्क असणे गरजेचे आहे. तुमचा जो मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक आहे, त्याच नंबरवरून तुम्ही पेमेंट करू शकता. तुमच्याकडे तुमचा UPI PIN असणे आवश्यक आहे. त्याशिवाय व्यवहार पूर्ण होणार नाही.

नंबर डायल केल्यानंतर निवडावे लागतील 'हे' पर्याय

  • जर तुमच्या फोनमध्ये इंटरनेट नसेल आणि तुम्हाला पैसे पाठवायचे असतील, तर खालील स्टेप्स फॉलो करा:
  • सर्वात आधी फोनच्या कीपॅडमध्ये जाऊन *99# डायल करा.
  • तुम्हाला तुमची भाषा निवडण्यास सांगितलं जाईल. तुम्ही हिंदी, इंग्रजी किंवा इतर प्रादेशिक भाषा निवडू शकता.
  • आता तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव किंवा IFSC कोडचे पहिले ४ अंक टाकावे लागतील.
  • तुमची बँक निवडा. स्क्रीनवर येणाऱ्या सूचनांचे पालन करत पुढे जा.
  • शेवटी, ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा नंबर किंवा UPI ID टाकून तुमचा UPI PIN टाका आणि पेमेंट पूर्ण करा.
  • ही पद्धत पूर्णपणे सुरक्षित आहे. यामुळे इंटरनेट नसतानाही तुमची महत्त्वाची कामे थांबणार नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : UPI Payments Without Internet: Dial *99# for Instant Transactions

Web Summary : No internet? No problem! Dial *99# on your phone for instant UPI payments. This simple method works on feature phones too. Link your bank account, enter your UPI PIN, and send money securely, even without a smartphone.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानInternetइंटरनेटSmartphoneस्मार्टफोनMobileमोबाइलMONEYपैसा