Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 14:42 IST2025-07-31T14:41:07+5:302025-07-31T14:42:20+5:30

Upcoming Smartphones in August 2025: जुलैनंतर आता ऑगस्ट महिना देखील स्मार्टफोन चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहे.

Upcoming Smartphones in August 2025: Google Pixel 10, Oppo K13 Turbo Series 5G, Vivo V60, and More | Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!

Upcoming Smartphones: विवो, रेडमीपासून ते गूगल पिक्सेलपर्यंत; ऑगस्टमध्ये पडणार स्मार्टफोनचा पाऊस!

जुलै महिना भारतातील स्मार्टफोन प्रेमींसाठी एक रोमांचक महिना ठरला. सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड ७, सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप ७ आणि नथिंग फोन ३ सह अनेक स्मार्टफोन बजारात दाखल झाले. दरम्यान, ऑगस्टमध्येही अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत, ज्यात विवो, रेडमीपासून आणि गूगल पिक्सेल कंपनीचा समावेश आहे.

१) विवो व्हाय ४०० 5G
हा स्मार्टफोन येत्या ४ ऑगस्ट २०२५ मध्ये लॉन्च होणार आहे. हा फोन ग्लॅम व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन रंग पर्यायांमध्ये उपलब्ध होणार आहे. या फोनमध्ये ग्राहकांना ६.६७ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड स्क्रीन डिस्प्ले दिला जाणार असल्याची माहिती आहे. फोटोग्राफीसाठी ग्राहकांना ड्युअर रिअर कॅमेरा सेटअप मिळण्याची शक्यता आहे, ज्याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेलचा असेल.

२) विवो व्ही ६०
विवो कंपनीचा नवा विवो व्ही ६० येत्या १२ ऑगस्ट २०२५ मध्ये भारतात लॉन्च होण्याची शक्यता आहे. लीक झालेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो, ज्यात मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सेल असेल, अशी अपेक्षा आहे. फोनमध्ये ६ हजार ५०० एमएएच क्षमता असलेल्या बॅटरी मिळण्याची शक्यता आहे, जी ९० वॅट सुपरफास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल, अशी माहिती आहे.

३) रेडमी १५ 5G
हा फोन येत्या १९ ऑगस्ट २०२५ रोजी भारतीय बाजारात एन्ट्री करेल, ज्यात ६.९ इंचाचा डिस्प्ले मिळण्याची शक्यता आहे. शिवाय, हा फोन एआय फिचर्सला समोर्ट करेल. अहवालांनुसार, हा फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजमध्ये लॉन्च केला जाऊ शकतो. फोनमध्ये एआय समर्थित ५० मेगापिक्सेल ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असण्याची शक्यता आहे.

४) गुगल पिक्सेल १० सिरीज
गुगल पिक्सेल १० सिरीज येत्या २० ऑगस्ट २०२५ रोजी मेड बाय गुगल इव्हेंटमध्ये लॉन्च होणार आहे, ज्यात गुगल पिक्सेल १०, पिक्सेल १० प्रो, पिक्सेल १० प्रो एक्सएल आणि पिक्सेल १० प्रो फोल्ड यांचा समावेश आहे. गुगल पिक्सेल १० प्रो आणि पिक्सेल १० प्रो एक्सएलमध्ये अनुक्रमे ६.३-इंच आणि ६.८-इंच डिस्प्ले असण्याची शक्यता आहे. तसेच या फोनमध्ये ४,८७०mAh आणि ५,२००mAh बॅटरी दिली जाऊ शकतो.  गुगल पिक्सेल १० मध्ये ४८-मेगापिक्सेलचा प्रायमरी रिअर कॅमेरा, १२-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेन्स आणि १०.८-मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर असण्याची अपेक्षा आहे. 

५) ओप्पो के१३ टर्बो सीरीज
ओप्पो के१३ टर्बो सीरीज लॉन्च करण्याबाबत गॅझेट ३६० ने एक्सक्लुझिव्हली बातमी दिली. या लाइनअपमध्ये दोन मॉडेल्स असण्याची अपेक्षा आहे. या फोनमध्ये ६.८० इंचाचा डिस्प्ले मिळण्याची अपेक्षा आहे. शिवाय, ५० मेगापिक्सेलचा रिअर कॅमेरा आणि ७००० एमएएच क्षमता असलेली बॅटरी मिळू शकते.

Web Title: Upcoming Smartphones in August 2025: Google Pixel 10, Oppo K13 Turbo Series 5G, Vivo V60, and More

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.