शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

ट्विटरवर 'फालतू' टिवटिव करणा-यांना बसणार चाप, अकाऊंट होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 14:32 IST

...तर तुमचं ट्विटर अकाऊंट बंद होण्याची आहे शक्यता

नवी दिल्ली - सोशल मीडिया सर्वांच्याच आयुष्याच एक अविभाज्य असा भाग झाला आहे. कुणासाठी केवळ टाइम पास करण्याचं साधन तर कुणासाठी प्रत्येक महत्त्वाच्या कामासाठी सोशल मीडियाचा वापर गरजेचं झाले आहे. आजच्या परिस्थितीत लोकं व्यवसाय, त्यासंदर्भातील बोलणीदेखील सोशल मीडियाच्याच माध्यमातून करताना पाहायला मिळतात. एवढंच नाही तर एखाद्याची खिल्ली उडवणं किंवा एखाद्याला उद्देशून अर्वाच्य भाषा वापरण्यासाठीदेखील सोशल मीडियाचा वापर केला जातो. एकूणच काय तर सर्व गोष्टींसाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. 

मात्र, ट्विटर आता एक अशी गोष्ट घेऊन येणार आहे, ज्यामुळे ट्रोलिंग करण्यावर कायमस्वरुपी आळा बसणार आहे. येत्या 18 डिसेंबरपासून ट्विटर वापरण्यासंदर्भात काही नवीन नियमांचा समावेश करण्यात येणार आहे. या नियमांमध्ये ट्रोलिंगसंदर्भातील देखील नियम आहेत. 

...तर अकाऊंट होईल बंदअभद्र-अर्वाच्य भाषा आणि खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला तर तुमचे अकाऊंट बंद होईल. साधारणतः टीका करताना किंवा एखाद्याची मस्करी करताना अयोग्य भाषेचा वापर केल्याचं पाहायला मिळते. Twitter च्या नवीन हेटफूल कंडक्ट पॉलिसीनुसार, ट्विटरवर जर कुणी अर्वाच्य भाषा किंवा एखाद्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न करत असेल, तर संबंधित व्यक्तीचे ट्विटर अकाऊंट बंद करण्यात येईल. येत्या 18 डिसेंबरपासून हा नियम लागू होणार आहे. 

अकाऊंट बंद करण्यापूर्वी दिला जाणार इशारा  जर कुणाकडून नियमांचं उल्लंघन करण्यात आले तर ट्विटरकडून सुरुवातीला युझरला संबंधित ट्विट डिलीट करण्याची सूचना देण्यात येईल. मात्र यानंतर पुन्हा नियमांचं उल्लंघन झालंच तर ट्विटरकडून अकाऊंट बंद केले जाईल. यानंतर युझर तोपर्यंत ट्विटरचा वापर करू शकत नाही जोपर्यंत ट्विटरकडून त्याचे अकाऊंट पुन्हा ओपन केले जात नाही.   या गोष्टीही केल्यानंही बंद होऊ शकते अकाऊंट1.  बौद्धिक संपत्तीची चोरी ( Intellectual Property )2. ग्राफिक्सच्या मदतीनं वापरलेलं अॅडल्ट कन्टेन्ट3. दुस-या युझरप्रमाणे युझर नेम ठेवण्याचा प्रयत्न 4. बोगस अकाऊंटद्वारे फसवणुकीचा प्रयत्न 

आता तक्रार करण्याची गरज नाही, ट्विटर स्वतःहून घेणार अॅक्शनआतापर्यंत एखाद्या युझरनं खिल्ली उडवल्याप्रकरणी किंवा अभद्र भाषा वापरल्याप्रकरणी तक्रार केल्यानंतरच ट्विटरकडून कारवाई केली जात होती. मात्र 18 डिसेंबरपासून आक्षेपार्ह असे काही घडल्यास युझरच्या तक्रारीची वाट न पाहता ट्विट स्वतःहूनच संबंधितांविरोधात कारवाई करणार आहे.   

टॅग्स :Twitterट्विटरtechnologyतंत्रज्ञानSocial Mediaसोशल मीडिया