शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Twitter Gold Tick Price: ट्विटरवर आता 'गोल्डन टीक'साठीही पैसे मोजावे लागणार; इलॉन मस्क दरमहा ८२,४६५ रुपये वसूल करणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 14:05 IST

Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत.

Twitter Gold Tick Price: गेल्या वर्षी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'ट्विटर'ची सूत्रे हाती घेतल्यापासून इलॉन मस्क अनेक मोठे निर्णय घेत आहेत. इलॉन मस्कने यापूर्वी ट्विटर ब्लू टिकसाठी ट्विटर युझर्सकडून पैसे आकारण्यास सुरुवात केली होती आणि आता 'गोल्ड टिक'साठी देखील कंपन्यांकडून शुल्क आकारण्याची तयारी केली जात आहे. 

सोशल मीडिया कन्सल्टंट Matt Navarra यांनी ट्विट केलेल्या अहवालानुसार, आता ट्विटर गोल्ड टिक असलेल्या बिझनेस अकाऊंटमधून दरमहा १ हजार डॉलर (सुमारे ८२ हजार ४६५ रुपये) गोळा करण्याचा मानस आहे.

ट्विटसह एक स्क्रीनशॉट देखील त्यांनी शेअर केला आहे, ज्यावरून असे दिसून येते की बिझनेस अकाऊंट असलेल्यांसाठी गोल्ड टिकची किंमत दरमहा १००० डॉलर असेल, तसेच अतिरिक्त ५० डॉलर (अंदाजे ४ हजार १२३ रुपये) देखील द्यावे लागतील. या वृत्ताला टेक न्यूज साइट 'द इन्फॉर्मेशन'ने पुष्टी दिली आहे. लवकरच याबाबतचा तपशील देखील अंतिम केला जाणार आहे आणि किंमतीच्या संरचनेत देखील बदल होऊ शकतो. ट्विटर कर्मचार्‍यांनी पाठवलेल्या मेलच्या स्क्रीनशॉटनुसार, या नवीन प्रस्तावाला संस्थांसाठी व्हेरिफाईड म्हटले जाईल. सध्या ही सेवा सर्वप्रथम कोणत्या देशात सुरू होणार आहे, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

ट्विटर बिझनेसच्या अधिकृत अकाऊंटवरून ट्विट करून अशी माहिती देण्यात आली आहे की आम्ही लवकरच कंपन्यांसाठी व्हेरिफिकेशन प्रक्रिया सुरू करणार आहोत. पूर्वी ब्लू फॉर बिझनेस म्हणून ओळखले जाणारे, आज आमच्या वेटलिस्टद्वारे अर्ज करू शकतात, असंही नमूद करण्यात आलं आहे. सर्वप्रथम, ट्विटर यूझर्ससाठी ब्लू टिकच्या सशुल्क सेवेअंतर्गत, मासिक खर्च ८ डॉलर (सुमारे ६५९ रुपये) पासून सुरू होतो जो ११ डॉलर (सुमारे ९०७ रुपये) पर्यंत जातो.

टॅग्स :elon muskएलन रीव्ह मस्कTwitterट्विटर