शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

Elon Musk: सामुहिक राजीनाम्यांची चिंता नाही, Twitter साठी एलॉन मस्क यांचा 'मास्टरप्लॅन' तयार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2022 11:23 IST

ट्विटरवर द्वेषपूर्ण विचार मांडल्यावर बसणार जबर धक्का, वाचा नवा प्लॅन

Elon Musk , Twitter: ट्विटरचा पदभार स्वीकारल्यापासून एलॉन मस्क काही ना काही घोषणा करत आहेत. कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यांपासून ते छाटणीपर्यंतची विविध गोष्टी कंपनीत सुरू आहेत. त्यावरून मस्क यांच्यावर टीकादेखील केली जात आहे, पण एलॉन मस्क हे स्वतःच्या पद्धतीने कंपनी चालवण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. याचदरम्यान, मस्क यांनी शनिवारी ट्विटरवर कंटेंट मॉडरेशन (Content Moderation) संदर्भात  आपली भूमिका स्पष्ट केली. ट्विटरच्या नवीन धोरणात युजर्सना मत मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल पण त्या विचारांच्या Reach बाबतचे स्वातंत्र्य नसेल. मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांच्या राजीनाम्यानंतर मस्क यांनी ही घोषणा केली.

सामुहिक राजीनाम्यांची चिंता नाही!

शुक्रवारी शेकडो ट्विटर कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला. मस्क यांनी ट्विटरचा कारभार चालवायला घेतल्यापासून आठवडाभरात कंपनीचे कर्मचारी संख्या निम्म्यावर आली आहे. शेकडो कर्मचार्‍यांनी अंतिम मुदतीपूर्वी कंपनीतून राजीनामा दिल्यानंतर, मस्क म्हणाले की मला अशा गोष्टींची चिंता नाही, कारण सर्वोत्तम कर्मचारी अजूनही माझ्या कंपनीत कार्यरत आहेत. मस्क यांनी ट्विटरवर लिहिले की, 'ट्विटरच्या नव्या धोरणात अभिव्यक्ती स्वातंत्र्य (Freedom of Speech) आहे पण Freedom of Reach (तुमची पोस्ट किती लोकांपर्यंत पोहोचेल याचे स्वातंत्र्य) नाही. द्वेषयुक्त आणि नकारात्मक ट्विट शक्य तितके डिबूस्ट केले जातील आणि वेळप्रसंगी त्यावर 'अर्थपूर्ण' कारवाई केली जाईल. Twitter वर कोणतीही जाहिरात किंवा कमाईचे अन्य साधन उपलब्ध होणार नाही. जोपर्यंत तुम्ही त्या गोष्टीसाठी विशेष शोध घेत नाही, तोवर ते ट्विट सापडणार नाही."

बनावट खात्यांसाठी कठोर पाऊल!

Twitter नवीन खात्यांना ९० दिवसांसाठी ब्लू सबस्क्रिप्शन सेवा खरेदी करण्याची परवानगी देणार नाही. द व्हर्जच्या रिपोर्टनुसार, याचा अर्थ युजर्स नवीन अकाउंट व्हेरिफाय करू शकणार नाहीत. घोटाळे आणि बनावट खात्यांची शक्यता कमी करण्याचा हा प्रयत्न असू शकतो. अहवालानुसार, जुन्या प्लॅनमध्ये प्रतीक्षा कालावधीचा उल्लेख नव्हता, परंतु 9 नोव्हेंबर 2022 रोजी किंवा त्यानंतर तयार केलेली Twitter खाती यावेळी Twitter Blue चे सदस्यत्व घेऊ शकणार नाहीत असे स्पष्ट संकेत आहेत. नवीन ट्विटर ब्लू पेज म्हणते की प्लॅटफॉर्म भविष्यात कोणत्याही सूचना न देता नवीन खात्यांसाठी प्रतीक्षा कालावधी लागू करू शकते.

टॅग्स :Twitterट्विटरelon muskएलन रीव्ह मस्क