शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

Spam Calls आणि मेसेजेसपासून होणार सुटका, ‘ट्राय’ तयार करतेय नवी व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 22:05 IST

ट्राय एका व्यवस्थेवर काम करत असून यामुळे फसवणुकीलाही बसणार आळा.

आपण ट्रायच्या (Telecom Regulatory Authority of India) कॉलर आयडी अॅपबद्दल अनेकदा ऐकले आहे. आता प्राधिकरणाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. सोमवारी, ट्रायने सांगितले की ते अनेक प्रकारच्या टेक्नॉलॉजीवर काम करत आहेत, जे त्रासदायक कॉल आणि एसएमएस डिटेक्ट शकतात.

एवढेच नव्हे तर आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी प्राधिकरण एका जॉईंट ॲक्शन प्लॅनवरही काम करत आहे. ट्रायने म्हटले आहे की UCC (अनसोलिसीटेड कमर्शियल कम्युनिकेशन) किंवा पेस्की कम्युनिकेशन हे लोकांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे. प्राधिकरणाने हे लोकांच्या प्रायव्हसीवर अतिक्रमण मानले आहे.

ट्रायची योजना काय?ट्रायने म्हटले आहे की, 'नोंदणीशिवाय टेलिमार्केटिंग कॉल करणाऱ्यांविरोधात आता तक्रारी दाखल केल्या जात आहेत. दुसरीकडे, यूसीसी एसएमएसच्या प्रकरणांमध्ये बरीच प्रगती झाली आहे. UCC कॉल ही देखील एक मोठी समस्या आहे. अत्यावश्यक बाबींमध्ये UCC डिटेक्शन सिस्टीम, डिजिटल कॉन्स्टंट ऍक्विझिशनची तरतूद, हेडर आणि मेसेज टेम्प्लेट्स, इंटेलिजेंस स्क्रबिंग, AI आणि मशीन लर्निंग यांचा समावेश आहे.

पेस्की कॉल आणि एसएमएस थांबवण्यासाठी, TRAI ने टेलिकॉम कमर्शियल कम्युनिकेशन्स कस्टमर प्रेफरन्स रेग्युलेशन 2018 जारी केले आहे. या अंतर्गत, ब्लॉकचेनवर आधारित एक इकोसिस्टम तयार केली जाईल. TRAI पूर्णपणे नवीन प्रणालीवर काम करत आहे, जेणेकरून मार्केटिंग कॉल्समध्ये घट करता येईल. यासोबतच एसएमएस आणि कॉलवर होणारी फसवणूक थांबवता येईल.

नवीन नियमांनुसार, सर्व कमर्शिअल प्रमोटर्स आणि टेलीमार्केटर यांना DLT प्लॅटफॉर्मवर नोंदणी करावी लागेल. याशिवाय प्रमोशनल मेसेज पाठवण्यापूर्वी ग्राहकांच्या प्रेफरन्सला पाहावं लागेल. या फ्रेमवर्क अंतर्गत, 2.5 लाख प्रिन्सिपलची नोंदणी करण्यात आली आहे, ज्यात 6 लाखांहून अधिक हेडर्स आणि सुमारे 55 लाख मेलेज टेम्पलेट्स आहेत. ट्रायच्या म्हणण्यानुसार, या फ्रेमवर्कनंतर ग्राहकांच्या तक्रारी कमी झाल्या आहेत. तथापि, लोक अजूनही नोंदणीकृत नसलेल्या त्रासदायक कॉलमुळे त्रस्त आहेत. हे कॉल्स बंद करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जात आहेत.

टॅग्स :TRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्राय