मोबाईलमध्ये 'हे' संकेत दिसले तर समजा फोन झाला हॅक?; कोणीतरी ठेवतंय तुमच्यावर नजर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 17:22 IST2024-02-18T17:20:41+5:302024-02-18T17:22:50+5:30
फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. फोन हॅक करणं सोपं झालं आहे.

मोबाईलमध्ये 'हे' संकेत दिसले तर समजा फोन झाला हॅक?; कोणीतरी ठेवतंय तुमच्यावर नजर
इंटरनेटच्या जमान्यात फोन हॅक होण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. तसेच, प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाचा प्रवेश होत आहे, त्यामुळे फोन हॅक करणं सोपं झालं आहे. अशा परिस्थितीत, तुमचा फोन हॅक झाला आहे हे तुम्हाला कसं कळेल? असे काही संकेत आहेत ज्याद्वारे तुम्हाला कळू शकेल की तुमचा फोन हॅक झाला आहे की नाही.
बॅटरी लाईफ
जर तुमच्या फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होत असेल, तर तुमचा फोन हॅक झाला असण्याची शक्यता आहे, कारण काहीवेळा बॅकग्राउंडमध्ये चालणाऱ्या हेरगिरी करणाऱ्या एप्समुळे फोनची बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. अशा परिस्थितीत फोनच्या बॅटरीकडे लक्ष देण्याची गरज आहे.
फोनवर अनावश्यक एप्स
तुम्ही तुमच्या फोनमधील एप्सबाबत डिटेल्स ठेवा जेणेकरून तुमच्या परवानगीशिवाय कोणतेही एप तुमच्या फोनमध्ये इन्स्टॉल होणार नाही. असं न झाल्यास फोन हॅक होऊ शकतो.
डिव्हाइस ओव्हरहिटींग
हेरगिरी करणारे एप्स सहसा रिअल टाइममध्ये डिव्हाइसचे लोकेशन ट्रॅकिंग करण्यासाठी जीपीएस सिस्टमचा वापर करतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनच्या हार्डवेअरवर जास्त दबाव येतो. त्यामुळे तो जास्त गरम होण्याची समस्या उद्भवते.
डेटा वापरात वाढ
जर तुमचा फोन ट्रॅक केला असेल तर डेटाचा वापर अचानक वाढतो. अशा परिस्थितीत डेटा वापरात अचानक वाढ होत असेल, तर तुम्ही सतर्क राहायला हवं.
डिव्हाइस खराब होणं
फोन हॅकिंगच्या बाबतीत, स्क्रीन फ्लॅशिंग, ऑटोमॅटिक फोन सेटिंग्ज बदलणं किंवा फोन काम न करणं यासारख्या डिव्हाइस खराब होण्याच्या घटना दिसू शकतात.
कॉलिंगमध्ये बॅकग्राऊंड न्वॉइज
काही हेरगिरी करणारे एप्स फोन कॉल रेकॉर्ड करतात. अशा परिस्थितीत, जेव्हा फोन कॉल दरम्यान कोणताही बॅकग्राऊंड न्वॉइज ऐकू येतो तेव्हा सावध राहावे, कारण ते हॅकिंगचे लक्षण असू शकतं.
अनावश्यक ब्राउजिंग हिस्ट्री
आपल्या डिव्हाइसची ब्राउझिंग हिस्ट्री चेक करा. ज्यामध्ये ट्रॅकिंग किंवा हेरगिरी एप्लिकेशन डाउनलोड करणाऱ्या लिंकची माहिती मिळेल.