टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2025 15:57 IST2025-01-29T15:56:50+5:302025-01-29T15:57:20+5:30

गेल्या काही वर्षापासून भारतात टिकटॉकला बंदी आहे. आता अमेरिकेतली दिग्गज कंपनी असलेली मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत आहे.

TikTok to return to India Preparing to buy Microsoft Donald Trump plays an important role | टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

टिकटॉक भारतात परतणार! मायक्रोसॉफ्ट खरेदी करण्याच्या तयारीत; डोनाल्ड ट्रम्प यांची महत्त्वाची भूमिका

भारतात गेल्या काही वर्षापासून टिकटॉकवर बंदी घातली आहे. आता टिकटॉक पुन्हा एकदा भारतात सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे.  काही दिवसापूर्वी टिकटॉक टेस्लाचे मालक इलॉन मस्क खरेदी करणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. मायक्रोसॉफ्ट टिकटॉक खरेदी करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे.

मायक्रोसॉफ्ट टिकटॉक ॲप खरेदी करण्यासाठी बोली लावत असल्याचे समोर आले आहे. जर मायक्रोसॉफ्टने हे ॲप खरेदी केले तर हे ॲप पुन्हा एकदा भारतात सुरू होऊ शकते, असा दावा करण्यात येत आहे. 

टिकटॉकच्या विकण्याच्या बातम्यावर अजूनही मुख्य कंपनी असलेल्या ByteDance कंपनीने प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिकेत टिकटॉकचे वापरकर्ते मोठ्या प्रमाणात आहेत. अमेरिकेत या प्लॅटफॉर्मचे १७० मिलियन वापरकर्ते आहेत. कंपनीने काही दिवसापूर्वी ही सेवा ऑफलाईन केली होती. नवीन कायदा लागू झाल्यानंतर byteDance कंपनीजवळ आता दोन पर्याय आहेत, एकतर टिकटॉक विकावे लागेल किंवा बॅनचा सामना करावा लागणार आहे.

३० दिवसात होणार निर्णय

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ २० जानेवारी रोजी घेतली. यानंतर त्यांनी नवीन कायद्याची अंमलबजावणी ७५ दिवसांनी पुढे ढकलण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यावेळी ट्रम्प म्हणाले होते की, टिकटॉक खरेदी करण्यासाठी अनेक लोकांशी चर्चा करत आहेत आणि कदाचित ३० दिवसांत निर्णय घेतला जाईल. त्यांच्या या विधानामुळे टिकटॉक अमेरिकी कंपनी खरेदी करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

काही दिवसापूर्वी ट्रम्प यांनी टेस्ला टिकटॉक खरेदी करण्यासाठी तयार असेल तर आम्ही यासाठी तयार आहे, यावर इलॉन मस्क यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान, याआधी AI स्टार्ट कंपनी पर्प्लेक्सिटी एआयने टिकटॉकला मर्जर करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. तर दुसरीकडे मायक्रोसॉफ्टही टिकटॉक खरेदी करण्याच्या तयारीत आहे. 

डोनाल्ड ट्रम्प पुन्हा अमेरिकेत सत्तेवर आल्यानंतर काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. ट्रम्प यांनी पहिल्या कार्यकाळातही मोठे निर्णय घेतले होते.

भारतात २०२० पासून टिकटॉकवर बंदी 

भारतात जून २०२० पासून टिकटॉकवर बंदी आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणास्तव भारतात टिकटॉकवर बंदी घालण्यात आली. जर मायक्रोसॉफ्टने टिकटॉक खरेदी केले तरटिकटॉक पुन्हा भारतात सुरु होण्याची शक्यता आहे. 

Web Title: TikTok to return to India Preparing to buy Microsoft Donald Trump plays an important role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.