पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
By admin | Updated: May 28, 2015 23:58 IST
पुणे : येत्या २४ तासात शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, आज शहराच्या तापमानात वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी ३५ अंशापर्यंत खाली गेलेले शहराचे तापमान आज ३७.७ अंशापर्यंत वाढले.
पुण्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
पुणे : येत्या २४ तासात शहरात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. दरम्यान, आज शहराच्या तापमानात वाढ झाली. दोन दिवसांपूर्वी ३५ अंशापर्यंत खाली गेलेले शहराचे तापमान आज ३७.७ अंशापर्यंत वाढले.शहरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ हवामान आहे. त्यामुळे राज्यात उष्णतेची लाट आलेली असतानाही पुण्यात मात्र तापमान ३६ अंशाच्या खाली असल्याने पुणेकरांना उकाडा जाणवत नव्हता. मात्र आज तापमानात वाढ झाल्याने पुणेकरांना उन्हाच्या झळा बसू लागल्या आहेत. उद्या शहराच्या काही भागांमध्ये दुपारनंतर मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि तापमान ३७ अंशाच्या घरातच राहिल, असा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे.