शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

Inspirational Story: एकेकाळी विकली भाजी; आता 20 वर्षीय 3 मित्रांनी सुरू केली कंपनी, झाले कोट्यधीश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2022 15:29 IST

उत्तर प्रदेशातील 3 मुलांनी स्वत:ची कंपनी सुरू केली असून आता ते कोट्यधीश झाले आहेत.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील ललितपूर या छोट्याशा शहरात राहणारे 3 मित्र एकेकाळी भीषण आर्थिक अडचणीचा सामना करत होते. यातून मार्ग काढण्यासाठी तिघांनी मिळून काहीतरी करण्याचा विचार केला. यानंतर त्यांनी एक कंपनी (GRAPS MARKETING) तयार केली आणि इस्टाग्राम मार्केटिंगमधून ते आता कोट्यधीश झाले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे त्यांची कंपनी सध्याच्या घडीला वर्षाला एक कोटी रुपयांचा व्यवसाय करते. 

अशी सुरू केली कंपनीआपण ज्या तीन मित्रांबद्दल भाष्य करत आहोत ते केवळ 20 वर्षांचे आहेत. मोहम्मद असद, मोहित शर्मा आणि प्रल्हाद कुशवाह अशी या 3 तरूण व्यावसायिकांची नावे आहेत. तिघेही उत्तर प्रदेशातील ललितपूरचे रहिवासी आहेत. हे तिघेही इस्टाग्राम इन्फ्लुएंसर्स मार्केटिंग कंपनीकडून कोट्यवधी रुपये कमवत आहेत. मोहम्मद असद 'GRAPS MARKETING' नावाने स्वतःचा स्टार्टअप चालवत आहेत. तर मोहित आणि प्रल्हाद हे त्याच्या कंपनीत भागीदार आहेत, ज्यांची समान भागीदारी आहे. खरं तर हे तिन्ही मित्र 'ग्रेप्स मार्केटिंग' या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. हे ब्रँड आणि इन्फ्लुएंसर्स यांना एकमेकाशी जोडण्याचे काम करतात. 

दरम्यान, ही कंपनी ब्रँड आणि इन्फ्लुएंसर्स यांना एकमेकांशी जोडून ठेवते. अर्थात इन्फ्लुएंसरचा व्हिडीओ इस्टाग्राम किंवा इतर कोणत्या फ्लॅटफॉर्मवर सुरू असेल तर ते एखाद्या प किंवा प्लॅटफॉर्मची जाहिरात करतात. यामध्ये असदच्या कंपनीचे काम इन्फ्लुएंसर आणि बॅंड यांच्यात करार करणे हे आहे. यातूनच त्यांच्या कंपनीला नफा मिळतो. 

एकेकाळी विकली होती भाजीया तीन मित्रांमधील प्रल्हाद कुशवाह याचे वडील एकेकाळी भाजी विकण्याचा व्यवसाय करत होते. तर असदच्या वडिलांचे इलेक्ट्रिकचे छोटे दुकान आहे. मोहितचे वडील सरकारी नोकरी करतात. तिघांनाही त्यांच्या ग्रॅज्युएशन दरम्यान इंटरनेटवरून इन्स्टाग्राम इन्फ्लुएंसर मार्केटिंगबद्दल माहिती मिळाली होती. त्यांनी याआधी याविषयी अनेक ब्लॉग लिहले आहेत. 

असे मिळाले यश या तिघांनी त्यांच्या यशाची कहाणी सांगताना म्हटले, 2020 मध्ये जेव्हा संपूर्ण देश कोरोनामुळे लॉकडाऊनमध्ये होता, त्यावेळी त्यांनी आपला व्यवसाय सुरू केला होता. याच काळात त्यांनी इंटरनेटवर इन्फ्लुएंसर मार्केटिंगचे बारकावे शोधण्यास सुरुवात केली. त्यानंतर हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी कुटुंबीयांकडून 50 हजार रुपये घेतले होते.

सध्या या तिघांच्या कंपनी सोबत 20 हजारांहून अधिक इन्फ्लुएंसर्स जोडले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते लहान ब्रँड्स याशिवाय लहान व्हिडीओ आणि शेअरिंग प्स तसेच एज्युकेशन प्लिकेशन्स सारख्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट होतात. यासाठी ते 10 टक्के कमिशन फी घेतात. यातूनच त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळत आहे. 

 

टॅग्स :technologyतंत्रज्ञानUttar Pradeshउत्तर प्रदेशInspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी