शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
5
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
6
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
7
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
8
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
9
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
10
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
11
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
12
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
13
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
14
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
15
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
16
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
17
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
18
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
19
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त

Threads ने ChatGPT टाकले मागे, अवघ्या 5 दिवसात 'इतक्या' लोकांनी केले डाउनलोड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2023 10:20 IST

थ्रेड्सला 6 जुलै 2023 रोजी 1 बिलियन युजर्ससह Public Conversation App बनण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले होते.

मेटा कंपनीच्या इंस्टाग्रामने ट्विटरला टक्कर देण्यासाठी थ्रेड्स (Threads) हे अ‍ॅप लाँच केले आहे. थ्रेड्स लाँच झाल्यापासून अवघ्या 5 दिवसात 100 मिलियन युजर्सचा टप्पा पार झाला आहे. थ्रेड्सने फास्टेस्ट कंझ्युमर प्रोडक्ट चॅटजीपीटी (ChatGPT) ला देखील मागे टाकले आहे. 

थ्रेड्सला 6 जुलै 2023 रोजी 1 बिलियन युजर्ससह Public Conversation App बनण्याच्या उद्देशाने लाँच करण्यात आले होते. मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी थ्रेड्सवरील पोस्टमध्ये जाहीर केले की, लाँच झाल्यापासून अवघ्या 5 दिवसात 100 मिलियन युजर्सपर्यंत पोहोचले आहे. तसेच, सोशल मीडिया थ्रेड्स अ‍ॅपची मागणी बहुतेक ऑर्गेनिक आहे, तर सध्या त्याचे अनेक प्रमोशन कार्यक्रम सुरूही झालेले नाहीत, असेही मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले. OpenAI चे जनरेटिव्ह AI-आधारित चॅटबॉट, चॅटजीपीटी लाँच झाल्यानंतर 40 दिवसांत 10 मिलियन डेली युजर्स आणि लाँच झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांत 100 मिलियन डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सपर्यंत पोहोचले होते. तेव्हा चॅटजीपीटी हे इंस्टाग्राम, टिकटॉक आणि इतर सोशल मीडियातील दिग्गज अ‍ॅप्सना मोठ्या फरकाने मागे टाकत 100 मिलियन डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्सपर्यंत पोहोचणारे फास्टेस्ट कंझ्युमर प्रोडक्ट बनले होते.

ट्विटरच्या सुद्धा ट्रॅफिकमध्ये घट!या व्यतिरिक्त, रिपोर्टनुसार जुलै 2022 पर्यंत ट्विटरचे एकूण 240 मिलिनय डेली अ‍ॅक्टिव्ह युजर्स होते. मात्र, वेब अ‍ॅनालिटिक्स फर्म SimilarWeb नुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत थ्रेड्स लाँच झाल्यापासून ट्विटरच्या वेब ट्रॅफिकमध्ये 11 टक्के घट झाली आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये ट्विटरची मालकी इलॉन मस्क यांच्याकडे आली. यानंतर सोशल मीडियावर ट्विटरऐवजी अनेक पर्याय युजर्स समोर आले आहेत. मात्र, यापैकी कोणताही पर्याय थ्रेड्सइतका यशस्वी झाला नाही.

जाणून घ्या फीचर्स...थ्रेड्स हे इंस्टाग्रामचे एक नवीन अ‍ॅप आहे, जे युजर्सना टेक्स्ट, लिंक शेअर करण्याची आणि इतर युजर्सच्या मेसेजना उत्तर देऊन किंवा पुन्हा पोस्ट करून कन्व्हर्सेशनमध्ये सामील होण्याची कॅपॅबिलिटी देते. अ‍ॅप युजर्सना आपल्या सध्याच्या इंस्टाग्राम अकाउंट युजर्सच्या नावाने लॉग-इन करण्याची आणि आपल्या फॉलोअर्सच्या लिस्टला फॉलो करण्याची परवानगी देते. म्हणजेच, यासाठी तुम्हाला वेगळे युजर्सचे नाव सेट करण्याची गरज नाही. दरम्यान, मेटा हे लोकप्रिय फोटो आणि व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे, ज्याचा युजर्स बेस 2 बिलियनपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये टॉप ब्रँड, प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि कंटेंट क्रिएटर्स सामील आहेत.

Threads कसे करावे इंस्टॉल?- सर्वात आधी Google Play Store वर जा आणि "Thread, an Instagram app" टाइप करा आणि अ‍ॅप इंस्टॉल करा.- यानंतर Login with Instagram चा ऑप्शन मिळेल. यानंतर तुमच्या WhatsApp वर लॉगिन कोड येईल, तो याठिकाणी भरा.- हे केल्यानंतर, "Import from Instagram" वर क्लिक करा. यानंतर ते इंस्टावरून तुमच्या प्रोफाइलमध्ये अ‍ॅक्सेस करेल.- स्क्रीनच्या खाली दिसत असलेल्या Continue च्या ऑप्शनवर क्लिक करा.- अटी आणि नियम वाचून Continue करा. यानंतर फॉलो सेम अकाउंट्स (ज्याला तुम्ही इन्स्टाग्रामवर फॉलो करता) वर क्लिक करा.- आता "Join Threads" वर क्लिक करा. अ‍ॅपल युजर्स देखील हीच प्रक्रिया फॉलो करून अ‍ॅप वापरू शकतात.

टॅग्स :Instagramइन्स्टाग्रामtechnologyतंत्रज्ञानTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया