मोबाईल चोरीला गेलाय? चोर स्वत: परत करेल फोन; ही ट्रीक करा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 16:07 IST2023-06-11T16:06:14+5:302023-06-11T16:07:34+5:30

सध्याच्या काळात स्मार्टफोन चोरीला जाण्याच्या घटना अनेक घडत आहेत.

the thief himself will return your phone know this easy way | मोबाईल चोरीला गेलाय? चोर स्वत: परत करेल फोन; ही ट्रीक करा सुरू

मोबाईल चोरीला गेलाय? चोर स्वत: परत करेल फोन; ही ट्रीक करा सुरू

सध्याच्या काळात मोबाईल वापरणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दुसरीकडे चोरीला जाण्याचेही प्रमाण वाढले आहे. आपला पोटन चोरीला गेला तर आपलं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. आजकाल मोबाईल बँकिंग आणि UPI पेमेंट सामान्य आहे. तसे, ही सेवा पासवर्ड संरक्षित आहे. पण तरीही त्याचा गैरवापर होऊ शकतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक अतिशय सोपा मार्ग सांगणार आहोत. जे केल्यानंतर चोर स्वत: तुमचा चोरीला गेलेला फोन परत देईल. जर फोन परत आला नाही तर तुम्ही तुमचा फोन लॉक करू शकाल. म्हणजे चोरीनंतरही तुमच्या मोबाईलचा गैरवापर होणार नाही. 

चॅलेंज अ‍ॅक्सेप्टेड! चॅटजीपीटीच्या मालकाने भारतातच भारतीयांचा अपमान केला; टेक महिंद्रा बदला घेणार

जर तुमचा फोन चोरीला गेला तर अगोदर https://sancharsaathi.gov.in/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर सिटीझन सेन्ट्रिक सर्व्हिसेस विभागात जावे लागेल. 

येथे Block Your Lost/Stolen Mobile हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल, त्यानंतर एक नवीन पृष्ठ उघडेल, जिथे तुम्हाला मोबाईलशी संबंधित माहिती प्रविष्ट करावी लागेल. जर तुमचा फोन ड्युअल सिम असेल तर दोन्ही मोबाईल एंटर करावे लागतील. 

याशिवाय 15 अंकी IMEI क्रमांक टाकावा लागेल.यासोबतच डिव्हाईसचा ब्रँड, मॉडेल नंबर, डिव्हाइस खरेदीचे बीजक, फोन हरवल्याची तारीख, वेळ आणि ठिकाण, जिल्हा, राज्याची माहिती द्यावी लागेल. यासोबतच पोलिस तक्रार क्रमांक, पोलिस ठाण्याचे ठिकाण याची माहिती द्यावी लागणार असून स्वतःचे नाव, पत्ता, ओळख आदी माहिती द्यावी लागणार आहे. सोबत मोबाईल क्रमांक, ईमेल टाकावा लागेल, त्यानंतर तक्रार नोंदवली जाईल. यानंतर तुम्ही फॉर्म सबमिट करू शकाल. यानंतर ब्लॉक होऊ शकतो.

Web Title: the thief himself will return your phone know this easy way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.