लोकसभा निवडणुकीतच टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन? रिचार्ज १५-१७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 01:59 PM2024-04-12T13:59:45+5:302024-04-12T14:00:27+5:30

Tarrif Plan Hike: मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

The plan of telecom companies in the Lok Sabha election itself? Recharge likely to increase 15-17 percent | लोकसभा निवडणुकीतच टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन? रिचार्ज १५-१७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

लोकसभा निवडणुकीतच टेलिकॉम कंपन्यांचा प्लॅन? रिचार्ज १५-१७ टक्क्यांनी महागण्याची शक्यता

सध्या लोकसभा निवडणुकीचा काळ सुरु झाला आहे. अद्याप प्रचाराला वेग आलेला नसला तरी टेलिकॉम कंपन्यांनी मात्र वेगवान इंटरनेटसाठी कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. वेगवान इंटरनेट आणि कॉलिंगचा वापर या काळात वाढणार आहे. यामुळे कंपन्यांनी टॅरिफ प्लॅनचे दर वाढविण्याची तयारी केल्याचे वृत्त येत आहे. 

मोबाईल रिचार्जमध्ये ही वाढ साधारण तीन वर्षांनी केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच रिचार्ज प्लॅन १५ ते १७ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. याचा सर्वाधिक फायदा एअरटेल आणि व्होडाफोन आयडियाला होण्याची शक्यता आहे. 

जर रिचार्ज वाढले तर त्याचा थेट फटका तुमच्या खिशावर पडणार आहे. आता जवळपास १० रुपयांच्या आत कोणतेच महिनाभराचे रिचार्ज येत नाही. फाईव्ह जी वापरायचे असल्यास कमीतकमी २४० रुपयांचे रिचार्ज मारावे लागत आहे. अशातच १५ ते १७ टक्क्यांनी रिचार्ज वाढल्यास त्यावरील कर आदी पकडून हे रिचार्ज ३०० रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. डिसेंबर २०२१ मध्ये कंपन्यांनी २० टक्क्यांची वाढ केली होती. 

व्होडाफोन आयडिया आर्थिक संकटात आहेत. यामुळे इतर कंपन्यांनी रिचार्ज वाढविले की ही कंपनी देखील त्यांचे फोरजी प्लॅन महाग करणार आहे. अद्याप या कंपन्यांकडून काही माहिती आलेली नाही. परंतु रिपोर्टनुसार आता फास्ट इंटरनेटसाठी जेवढे जेवढे पैसे मोजावे लागतायत त्यापेक्षा १४ रुपये जास्त मोजावे लागण्याची शक्यता आहे. मोबाईल कंपन्या थेट फाईव्ह जी वापरणाऱ्यांना टार्गेट करू शकतात. सध्या फ्री असले तरी सवय लागली आहे. ते आता या डेटावर लिमिट आणि पैसे आकारू शकतात. 

Web Title: The plan of telecom companies in the Lok Sabha election itself? Recharge likely to increase 15-17 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.