शहरं
Join us  
Trending Stories
1
भयावह! अण्वस्त्रांच्या चाचणी युद्धाला तोंड फुटले; रशियाचे पाहून ट्रम्पनी पेंटागॉनला आदेश दिले...
2
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
3
गंभीर दुखापतीनंतर श्रेयस अय्यरने पहिल्यांदाच केली सोशल मीडिया पोस्ट, दिली महत्त्वाची माहिती
4
Video - बापरे! ट्रेनमध्ये पर्स चोरीला गेली, महिला संतापली; एसी कोचच्या खिडकीची काच फोडली
5
एक सेल्फी घेतला अन् विषाची बाटली तोंडाला लावली! ३ वर्षांच्या बाळाच्या आई-वडिलांनी का उचललं टोकाचं पाऊल?
6
करदात्यांना मोठा दिलासा! ITR फाईल करण्याची अंतिम मुदत वाढवली; 'ही' आहे नवीन तारीख
7
ट्रम्प यांना मोठा झटका; त्यांच्याच पक्षाचे चार सिनेटर फिरले, कॅनडावरील अतिरिक्त १०% शुल्क लावण्याचा अधिकार काढून घेतला
8
November Astro 2025: नोव्हेंबरची सुरुवात अत्यंत शुभ; आदित्य राजयोगात 'या' ८ राशींचा भाग्योदय
9
IND W vs AUS W Semi Final Live:हीच ती वेळ! कांगारूंची शिकार करत टीम इंडियाच्या वाघीणीं फायनल गाठणार?
10
५ दिवस अशुभाची सावली, पंचक सुरू होणार शुक्रवारी; नेमके काय करावे अन् करू नये? पाहा, ५ नियम
11
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
12
"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
अमेरिकेतील Rate Cut चा परिणामच नाही... उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण; 'हे' स्टॉक्स आपटले
14
मिथुन चक्रवतींच्या सुनेसोबत साऊथ इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा प्रकार, म्हणाली- "१७ वर्षांची असताना..."
15
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
16
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
17
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
18
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
19
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
20
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू

सरकारचं नवं विधेयक Whatsapp अन् Musk साठी ठरू शकतं भारी, बातमी Jio-Airtel ची झोप उडवणारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 13:39 IST

आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रणही ठेवू शकते. महत्वाचे म्हणजे, आता सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपही करता येणार आहे.

संसदेत गुरुवारी दूरसंचार विधेयक म्हणजेच टेलीकम्युनिकेशन बिल मंजूर करण्यात आले. यामुळे दूरसंचार सेवेवर सरकारचे तात्पुरते नियंत्रण आले आहे. आता राष्ट्रीय सुरक्षिततेच्या कारणास्तव सरकार दूरसंचार सेवांवर नियंत्रणही ठेवू शकते. महत्वाचे म्हणजे, आता सरकारला लिलावाशिवाय सॅटेलाइट स्पेक्ट्रम वाटपही करता येणार आहे.

टेलीकम्युनिकेशन बिल-2023 वर गुरुवारी व्हॉइस व्होटिंग झाले आणि हे विधेयक राज्यसभेतही मंजूर झाले. यामुळे आता Whatsapp आणि Starlink ला फायदा होऊ शकतो. कारण यामुळे इलॉन मस्क थेट लायसन्स मिळवू शकतील. ते आधीपासूनच सरकारकडे लायसन्सिंग सिस्टिमची मागणी करत आहेत.

महत्वाचे म्हणजे, हे विधेयक बुधवारीच चर्चेनंतर लोकसभेत मंजूर झाले होते. हे बिल सरकारला तत्पुरत्या नियंत्रणाची परवानगी देते. एवढेच नाही, तर हे बिल केंद्र सरकारला पब्लिक इमरजन्सीमध्ये टेलीकॉम नेटवर्क आपल्या हाती घेण्याची परवानगीही देते. जनतेची सुरक्षितता लक्षात घेत सरकार टेलीकॉम नेटवर्कचे नियंत्रित करू शकते. यानंतर आता सरकार पब्लिक इमरजन्सीमध्ये मॅसेजचे ट्रान्समिशन आणि इंटरसेप्टिंगवरही बंदी घालू शकते. गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सरकार मॅसेजवर यासंदर्भात निर्णय घेऊ शकते. अर्थात सरकारला संपूर्ण पॉवर मिळते. तसेच, या विधेयकानुसार, पब्लिक इमरजेंसी आणि पब्लिक ऑर्डरच्या नियमांतर्गत येत नाही, तोपर्यंत मेसेज आडवले जाणार नाहीत. हे नियम केंद्र आणि राज्य या दोन्ही सरकारसाठी असतील.

कम्युनिकेशन मिनिस्टर अश्विनी वैष्णव म्हणाले, न्यू इंडियाला डोळ्यासमोर ठेवून हे टेलीकम्युनिकेशन बिल-2023 आणण्यात आले आहे. जे वसाहतकालीन कायद्याची जागा घेईल. गेल्या साडे नऊ वर्षांत, भारताचे टेलीकॉम सेक्टर अत्यंत कठीन काळातून बाहेर पडून सनराइज सेक्टर बनले आहे. याच काळात टेलीकॉम टॉवर 6 लाखवरून 25 लाखांवर पोहोचले आहे. आता इंटरनेट ब्रॉडबँड युजर्सदेखील 85 कोटींवर पोहोचले आहेत. आधी हे केवळ 1.5 कोटी होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात भारतात 5G तत्रज्ञान आले आणि जनतेला फास्ट इंटरनेट मिळाले.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारelon muskएलन रीव्ह मस्कMukesh Ambaniमुकेश अंबानीSocial Mediaसोशल मीडियाInternetइंटरनेटbusinessव्यवसाय