ChatGpt अन् Gemini चं टेन्शन वाढलं! मेटाने आणलं नवीन AI मॉडेल, जाणून घ्या फिचर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:53 IST2025-04-06T18:39:48+5:302025-04-06T18:53:32+5:30
ChatGPT आणि Gemini ला आता मोठा झटका बसणार आहे. मेटाने नवीन AI मॉडेल लाँच केले आहे.

ChatGpt अन् Gemini चं टेन्शन वाढलं! मेटाने आणलं नवीन AI मॉडेल, जाणून घ्या फिचर
सध्या एआय ची जोरदार चर्चा सुरू आहे. चॅटजीपीटी आणि गुगलच्या जेमीनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. तर दुसरीकडे आता मेटानेही नवीन एआय मॉडेल लाँच केले आहे. मार्क झुकरबर्ग यांनी लामा 4 सेरीजमध्ये त्यांचे नवीन एआय मॉडेल सादर केले आहे. हे तुम्ही व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम आणि कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन वापरू शकता.
कंपनीने दोन नवीन लामा 4 मॉडेल सादर केले आहेत. लामा 4 स्काउट आणि लामा 4 मॅव्हरिक. या मॉडेल्स व्यतिरिक्त, मेटाने लामा 4 बेहेमोथ नावाचे आणखी एक मॉडेल सादर केले आहे. जगातील सर्वात स्मार्ट एलएलएमपैकी एक आहे. एवढेच नाही तर नवीन मॉडेल्ससाठी शिक्षक म्हणून काम करण्याच्या बाबतीतही ते सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे.
मेटा त्यांच्या लामा 4 मॉडेलला मजकूर, फोटो आणि व्हिडीओ डेटाचे पूर्व-प्रशिक्षण देऊन मल्टीमॉडल होण्यासाठी प्रशिक्षित करते. मॉडेल फोटो आणि मजकूर दोन्ही समजू शकते आणि त्यांना चांगला प्रतिसाद देऊ शकते. हे नवीन मॉडेल चिनी एआय स्टार्टअप डीपसीक सारखेच आहे. हे मिक्सचर ऑफ एक्सपर्ट्स नावाच्या नवीन मशीन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करते जे मॉडेलच्या वेगवेगळ्या भागांना चांगल्या कामगिरी आणि कार्यक्षमतेसाठी प्रशिक्षित करण्याची सुविधा देते.
मेटाने जाहीर केलेल्या या कोणत्याही नवीन मॉडेलमध्ये OpenAI o3-mini किंवा DeepSeek R1 सारखे 'Reason' फिचर नाही. 'Reason' फिचर एखाद्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थोडा जास्त वेळ घेते आणि अधिक कठीण प्रश्नांची चांगली उत्तरे देण्यासाठी डिझाइन केलेले आहे.
Mark Zuckerberg just announced Llama 4, the newest model for the AI chatbot, now available on WhatsApp, Messenger, and Instagram Direct. This model introduces next-generation intelligence, with smarter, faster, and more helpful responses than ever. Llama 4 offers powerful… pic.twitter.com/3XpOOV9R8i
— WABetaInfo (@WABetaInfo) April 5, 2025