शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दमदार बॅटरी, प्रीमिअम लूक आणि बरेच काही; Tecno Pova Curve 2 5G भारतात लॉन्च, किंमतही कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 14:57 IST

Tecno Pova Curve 2 5G Launched in India: स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतीय बाजारात आपला नवा आणि शक्तिशाली स्मार्टफोन टेक्नो पोवा कर्व्ह २ 5G अधिकृतपणे लॉन्च केला आहे.

स्मार्टफोन निर्माता कंपनी टेक्नोने भारतीय बाजारात आपला नवा आणि शक्तिशाली स्मार्टफोन टेक्नो पोवा कर्व्ह २ 5G अधिकृतपणे लॉन्च केला आहे. हा फोन गेल्या वर्षीच्या मॉडेलचा अपग्रेड असून, यात दमदार बॅटरी, कर्व्ह डिस्प्ले आणि युनिक कॅमेरा डिझाइन देण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, हा मिड-रेंज स्मार्टफोन आहे, त्यामुळे ग्राहकांना परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्स असलेला स्मार्टफोन खरेदी करता येणार आहे.

टेक्नो पोवा कर्व्ह २ 5G मध्ये ७८-इंचाचा कर्व्ह AMOLED डिस्प्ले, जो १४४Hz रिफ्रेश रेट आणि ४,५०० निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. यात मीडियाटेक डायमेन्सिटी ७१०० चिपसेट देण्यात आला आहे. या फोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याची ८०००mAh ची प्रचंड बॅटरी, जी ४५ वॅट यूएसबी टाइप-सी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या फोनच्या मागील बाजूस ५० मेगापिक्सेल+ २ मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळतो. तर, सेल्फी आणि व्हिडीएओ कॉलिंगसाठी १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा मिळतो. हा फोन लेटेस्ट अँड्रॉइड १६ वर आधारित HiOS वर चालतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी याला IP64 रेटिंग देण्यात आले आहे.

हा फोन दोन व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आला असून स्टॉर्म टायटॅनियम , मेल्टिंग सिल्वर आणि मिस्टिक पर्पल अशा तीन आकर्षक रंगांत उपलब्ध आहे. दरम्यान, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. तर, ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनची किंमत २९ हजार ९९९ रुपये इतकी आहे. या फोनचा पहिला सेल २० फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर होणार आहे. कंपनी फोनच्या खरेदीवर ३००० रुपयांची इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. 

टेक्नोचा हा फोन प्रामुख्याने अशा युजर्ससाठी डिझाइन केला आहे, ज्यांना लांब बॅटरी बॅकअप आणि प्रीमियम लूक हवा आहे. हाय रिफ्रेश रेटमुळे गेमिंग आणि व्हिडिओ पाहण्याचा अनुभव अधिक स्मूथ मिळतो. तसेच, लाँच ऑफरमुळे हा फोन ग्राहकांना अधिक स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tecno Pova Curve 2 5G Launched in India: Price, Features

Web Summary : Tecno Pova Curve 2 5G debuts in India with a curved display, massive 8000mAh battery, and 50MP camera. Available on Flipkart, it offers premium features at an affordable price with launch discounts.
टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनtechnologyतंत्रज्ञान