शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
2
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
3
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
4
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
5
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
6
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर
7
उपविभागीय दंडाधिकाऱ्याने पत्नी आणि मुलांना काढलं घराबाहेर, वणवण भटकण्याची आली वेळ   
8
सत्यपाल मलिक यांना श्रद्धांजली वाहताना जम्मू-काश्मीर विधानसभेत रणकंदन, नॅशनल कॉ़न्फ्रन्स आणि भाजपाचे आमदार भिडले 
9
मी विकृतीविरोधात लढतोय, भाजपा नाही; रवींद्र धंगेकरांचा पुन्हा हल्लाबोल, मोहोळांवर निशाणा
10
भारत ऑस्ट्रेलियाशी हरल्यावर 'कॅप्टन' गिलने घेतलं रोहितचं नाव; कुणावर फोडलं पराभवाचं खापर?
11
राज आणि उद्धव ठाकरेंसह संपूर्ण ठाकरे कुटुंब भाऊबीजेसाठी अनेक वर्षांनी आलं एकत्र, पाहा खास फोटो
12
उल्हासनगरात दिवाळीत पाणीटंचाईमुळे संताप; नागरिकांचा घरासमोर रिकामा हंडा ठेवून निषेध
13
Nagpur: नागपूर पदवीधरसाठी भाजपचा 'तो' चेहरा कोण? मुख्यमंत्र्यांनी दिले मोठे संकेत!
14
IND W vs NZ W, World Cup 2025 : टीम इंडियाची सुपरहिट जोडी! स्मृती-प्रतीकानं 'द्विशतकी' भागीदारीसह रचला इतिहास
15
Video: पेशावर शहरात ना पाकिस्तानी सैन्य ना सरकार; TTP चा कब्जा, असीम मुनीरच्या दाव्याची पोलखोल
16
Smriti Mandhana Century: स्मृतीची विक्रमी सेंच्युरी; वर्ल्ड रेकॉर्ड सेट करत झाली नवी 'सिक्सर क्वीन'
17
Jogeshwari Fire: १० व्या मजल्यावरुन 'ते' ओरडत होते, कपडे लपेटून घेतले; जोगेश्वरीतील अग्नितांडवाची थरारक दृश्य समोर...
18
ऑस्ट्रेलियाची 'दिवाळी'! भारतीय गोलंदाज 'फुसका बार'; कांगारुंनी फोडले 'मालिका विजया'चे फटाके
19
४० हजारांची नाणी घेऊन स्कूटी खरेदी करण्यासाठी पोहोचला शेतकरी, कर्मचाऱ्यांची तारांबळ, त्यानंतर...
20
Viral Video: पेट्रोलच्या पिशवीवर फटाका फोडला, तरुणासोबत घडलं भयंकर!

फोन गॅलरीमध्ये दिसणार नाही Whatsapp वर आलेला फोटो; जाणून घ्या कसं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 12:53 IST

फोटो, व्हिडीओ, ऑडिओ हे व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पाठवले जातात. मात्र त्यातील काही फोटो हे खास असतात त्यामुळे ते सीक्रेट ठेवणं गरजेचं असतं. 

नवी दिल्ली - व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. युजर्सचा संवाद अधिक मजेशीर व्हावा यासाठी अनेक फीचर्स उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप संवाद साधण्याचं लोकप्रिय आणि प्रभावी माध्यम असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा वापर केला जातो. फोटो, व्हिडीओ, ऑडिओ हे व्हॉट्सअ‍ॅपवरून एकमेकांना पाठवले जातात. मात्र त्यातील काही फोटो हे खास असतात त्यामुळे ते सीक्रेट ठेवणं गरजेचं असतं. 

व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले काही खास फोटो किंवा व्हिडीओ हे फोटोगॅलरीत दिसू नये असं अनेक युजर्सना वाटत असतं. त्यामुळे ते फोटो डिलीट करतात. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवर आलेले हे फोटो आणि व्हिडीओ डिलीट करण्याची काही गरज नाही. ते फोनमध्ये ठेवता येतात. यासाठी चॅटमध्ये जाऊन अथवा ग्रुपमध्ये जाऊन त्या कॉन्टॅक्टवर टॅप करा. टॅप केल्यावर मीडिया व्हिजिबिलीटीचा एक पर्याय मिळेल. तेथे NO असं करा. असं केल्यानंतर फोटो अथवा व्हिडीओ फोनच्या गॅलरीमध्ये दिसणार नाही. 

व्हॉट्सअ‍ॅपवरून लोकेशन देखील शेअर केलं जातं. लोकेशन शेअर करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटमध्ये अटॅचमेंट ऑप्शन देण्यात आला आहे. त्यावर क्लिक करून शेअर लोकेशन लाईव्हचा पर्याय मिळेल. लाईव्ह लोकेशन युजर्स 15 मिनिट, एक तास आणि आठ तासांसाठी शेअर करू शकतात.  राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, क्रीडा, बातम्या, फोटो यासह अनेक गोष्टीची संपूर्ण माहिती गुगलच्या एका क्लिकवर अगदी सहज मिळते. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवरही गुगलप्रमाणेच हवं ते सर्च करता येणार आहे. 

युजर्स व्हॉट्सअ‍ॅप बोटच्या (Whatsapp Bot) माध्यमातून हे अ‍ॅप सर्च इंजिनमध्ये बदलू शकतात. या फीचरच्या मदतीने युजर्स खेळ, मनोरंजन, टेक, बातम्या यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी सर्च करू शकतात. व्हॉट्सअ‍ॅप गुगल सर्च इंजिनमध्ये बदलण्यासाठी युजर्सना काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. बॉट Duta.in हे संगणक अथवा लॅपटॉपवर ओपन करा. युजर्सना या साईटवर व्हर्चुअल असिस्टंटसारखे फीचर्स मिळतील ज्याच्या माध्यमातून युजर्सना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं ही व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार आहेत. मात्र यासाठी सर्वप्रथम बॉट अ‍ॅक्टिवेट करणं गरजेच आहे. 

काय सांगता? 'या' स्मार्टफोन्सवर चालणार नाही WhatsApp

WhatsApp कमाल करणार; चॅट आपोआपच गायब होणारव्हॉट्सअ‍ॅपच्या फीचरवर लक्ष ठेवणारी साईट WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकच्या मालकीची कंपनी व्हॉट्सअ‍ॅप एका अशा भन्नाट फिचरवर काम करत आहे की, पाठविलेला मॅसेज किती वेळ दिसेल याची वेळ पाठवणाऱ्याला ठरवता येणार आहे. म्हणजेच एखाद्याने मेसेज केला तर त्या मेसेजचे आयुष्य ठरवता येणार आहे. ही वेळ संपल्यानंतर चॅट आपोआप डिलीट होणार आहे. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमध्ये डिसअ‍ॅपीअर्ड हे फीचर देण्यात येणार आहे. हे सिलेक्ट केल्यावर सर्व चॅट गायब होणार आहे. हे फीचर आधीपासूनच टेलिग्राम अ‍ॅपवर आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर सध्या पाठविलेले मेसेज पाठवणाऱ्याकडून डिलीट करता येतात. यावेळी मेसेज डिलिटेड असे दिसते. परंतू नव्या फिचरमध्ये हे दिसणार नाही. टाईम एक्स्पायर असे दिसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपtechnologyतंत्रज्ञान