शहरं
Join us  
Trending Stories
1
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
2
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
3
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
5
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
6
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
7
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
8
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

WhatsApp व्हॉईस कॉल अशा पद्धतीने करा रेकॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 1:44 PM

युजर्सना स्मार्टफोनवर एखादा व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा असते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरही अशा पद्धतीने व्हॉईस कॉल रेकॉर्ड करता येतो.

ठळक मुद्देव्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने कोणतही फीचर नवीन फीचर आणलेलं नाही.थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करता येतो.

नवी दिल्ली - युजर्सचं चॅटींग आणखी मजेशीर व्हावं यासाठी व्हॉट्सअ‍ॅप सातत्याने नवनवीन फीचर्स आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपने काही महिन्यांपूर्वी आपल्या युजर्सना व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे युजर्सना संवाद साधनं आणखी सोपं झालं. युजर्सना स्मार्टफोनवर एखादा व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्याची सुविधा असते. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरही अशा पद्धतीने व्हॉईस कॉल रेकॉर्ड करता येतो. व्हॉईस कॉल रेकॉर्ड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने कोणतही फीचर नवीन फीचर आणलेलं नाही तर थर्ड पार्टी अ‍ॅपच्या मदतीने कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. अ‍ॅन्ड्रॉईड आणि आयफोनवर व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड करता येतो.

 आयफोनवर WhatsApp व्हॉईस कॉल असा करा रेकॉर्ड 

- सर्वप्रथम आयफोन लायटनिंग केबलच्या मदतीने Mac ला कनेक्ट करा. 

- Trust this computer या पर्यायावर क्लिक करा. मात्र जेव्हा तुम्ही फोन पहिल्यांदा संगणकाला कनेक्ट कराल तेव्हाच या पर्यायाबाबत विचारणा करण्यात येईल. 

-  QuickTime वर यानंतर क्लिक करून ओपन करा. 

- येथे देण्यात आलेल्या फाईल सेक्शनमध्ये न्यू ऑडिओ रेकॉर्डींगचा एक पर्याय दिसेल.

- एक डाऊन अ‍ॅरो देखील दिसेल. त्यावर क्लिक करून iPhone या पर्यायावर क्लिक करा. 

- क्विकटाइममध्ये रेकॉर्ड बटणावर क्लिक करा. त्यानंतर आपल्या फोनमधून व्हॉट्सअ‍ॅप कॉल करा. 

- कनेक्ट झाल्यानंतर आयकॉन अ‍ॅड करा. ज्या व्यक्तीसोबत तुम्हाला संवाद साधायचा आहे त्या व्यक्तीला सिलेक्ट करा. यानंतर कॉल रेकॉर्ड होण्यास सुरुवात होईल. 

- कॉलवर बोलून झाल्यानंतर क्विकटाइममध्ये रेकॉर्डींग बंद करा आणि Mac मध्या तुम्हाला हव्या असलेल्या नावाने फाईल सेव्ह करा. 

WhatsApp वर क्वालिटी खराब न करता 'असे' पाठवा फोटो

WhatsApp चे 'हे' 5 फीचर्स करणार कमाल; चॅटिंग करताना येणार धमाल

अ‍ॅन्ड्रॉईडवर WhatsApp व्हॉईस कॉल असा करा रेकॉर्ड 

- सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवर जाऊन Cube Call Recorder हे अ‍ॅप डाऊनलोड करा. ते इन्स्टॉल केल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.

 - तुम्हाला जो कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्या व्यक्तीला कॉल करा. 

- कॉल केल्यानंतर स्क्रीनवर Cube Call असं दिसत असेल तर हे अ‍ॅप आपल्या फोनमध्ये काम करत आहे. 

- कॉल केल्यावर कोणत्याही स्वरुपाचा एरर येत असेल तर अ‍ॅप पुन्हा एकदा ओपन करून अ‍ॅप सेटींगमध्ये जाऊन व्हॉईस कॉलमध्ये Force VoIP वर क्लिक करा. 

- स्क्रीनवर Cube Call असं दिसल्यास तुमचा व्हॉट्सअ‍ॅप कॉल रेकॉर्ड होईल. 

WhatsApp वर 'हे' जबरदस्त फीचर येणार, नको असलेल्या ग्रुपपासून सुटका होणारव्हॉट्सअ‍ॅप हे संवाद साधण्याचं अत्यंत प्रभावी माध्यम आहे. व्हॉट्सअ‍ॅप 'ग्रुप इन्विटेशन' हे नवीन फीचर देखील लवकरच लाँच करणार आहे. या फीचरमुळे युजर्संना कोणत्याही ग्रुपमध्ये अ‍ॅड करण्याआधी तुमची परवानगी घेणं गरजेचं असणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचं हे नवं फीचर इन्विटेशनच्या आधारे काम करणार आहे. सध्या या फीचरची चाचणी सुरू आहे.  WABetaInfo ने दिलेल्या माहितीनुसार, हे फीचर iOS व्हर्जनसाठी उपलब्ध असणार आहे. तसेच 'ग्रुप इन्विटेशन' हे फीचर 'Privacy' सेक्शन मध्ये असणार आहे. 

WhatsApp वरच्या चॅटिंगची गंमत वाढणार, 230 नवीन इमोजी येणारव्हॉट्सअ‍ॅपवर शब्दांऐवजी भावना व्यक्त करण्यासाठी इमोजीचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. आता व्हॉट्सअ‍ॅपवरच्या चॅटिंगची गंमत आणखी वाढणार आहे कारण इमोजीच्या लिस्टमध्ये 230 नवीन इमोजींचा लवकरच समावेश होणार आहे. युनिकोडने 2019 साठी नवीन 230 इमोजीची अधिकृत लिस्ट जाहीर केली आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरील इमोजीच्या लिस्टमध्ये 59 नवीन इमोजीमध्ये 171 व्हेरिअंटचा समावेश आहे. या नवीन इमोजीमध्ये प्राणी, फळ, भाज्या, मेकॅनिकल आर्म, वेफल, आईस क्यूब, ब्लड ड्रॉप, बटर, रिक्षा अशा अनेक इमोजींचा समावेश आहे.

 

टॅग्स :WhatsAppव्हॉटसअ‍ॅप