तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर ठेवणार ‘वॉच’; 10 मिनिटांच्या चार्जवर 10 तासांचा बॅकअप
By सिद्धेश जाधव | Updated: March 31, 2022 19:31 IST2022-03-31T19:31:04+5:302022-03-31T19:31:17+5:30
Tagg Verve Connect स्मार्टवॉच फ्लिपकार्टवरून विकत घेता येईल. या स्मार्टवॉचमध्ये ब्लड-ऑक्सीजन मॉनिटर (SpO2), हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग फिचर मिळतात.

तुमच्या हृदयाच्या आरोग्यावर ठेवणार ‘वॉच’; 10 मिनिटांच्या चार्जवर 10 तासांचा बॅकअप
येत्या 2 एप्रिलला भारतात Tagg Verve Connect स्मार्टवॉच लाँच होणार आहे, कंपनीनं याची माहिती दिली आहे. यात ब्लड-ऑक्सीजन मॉनिटर (SpO2), हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग, हेल्थ फीचर्स देण्यात येतील. हे स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर लिस्ट करण्यात आलं आहे. याची किंमत देखील या लिस्टिंगमधून समजली आहे. चला जाणून घेऊया बजेट स्मार्टवॉच Tagg Verve Connect बद्दल.
Tagg Verve Connect ची किंमत
Tagg Verve Connect स्मार्टवॉच फ्लिपकार्टवर 2799 रुपयांमध्ये लिस्ट झालं आहे. याची विक्री 2 एप्रिलला दुपारी 12 वाजल्यापासून सुरु केली जाईल. याच दिवशी कंपनी या वॉचचा लाँच देखील करेल. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांना या वॉचच्या खरेदीवर 5% टक्के अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात येईल.
Tagg Verve Connect चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स
या स्मार्टवॉचमध्ये 1.7 इंचाचा आयपीएस एलसीडी टचस्क्रीन डिस्प्ले देण्यात येईल. जो 500 निट्सच्या पीक ब्राईटनेसला सपोर्ट करेल. वॉटर आणि डस्ट रेजिस्टेंससाठी IP67 रेटिंग मिळते. सोबत म्यूजिक आणि कॅमेरा कंट्रोल, टायमर, अलार्म, एसएमएस अलर्ट आणि स्मार्ट असिस्टंट फिचर मिळतं. स्मार्टवॉचचा वापर करून थेट कॉलिंग करता येईल, कारण यात बिल्ट-इन डायल पॅडसह ब्लूटूथ कॉलिंग देण्यात आली आहे. तुम्ही 100 कॉन्टॅक्ट देखील यावर सेव्ह करून ठेवू शकता.
Tagg Verve Connect मध्ये ब्लड-ऑक्सीजन मॉनिटर (SpO2), हार्ट रेट मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग, असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. यात 24 स्पोर्ट्स मोड मिळतात, ज्यात रनिंग, सायकलिंग, स्विमिंग, फुटबॉल, बास्केटबॉल आणि अन्य खेळांचा समावेश आहे. तसेच क्लाउड बेस्ड 150+ स्पोर्ट्स मोड देखील देण्यात आले आहेत. फुल चार्जमध्ये हे स्मार्टवॉच 5 दिवस वापरता येईल. तर फक्त 10 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 10 तासांचा बॅटरी लाईफ आलेलं.