T-Series YouTube Subscribers: T-Series नं केला जागतिक विक्रम; 2000 मिलियन सबस्क्रायबर्स बेस असलेला ठरला पहिला Youtube चॅनेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2021 19:49 IST2021-12-07T19:49:00+5:302021-12-07T19:49:31+5:30
T-Series YouTube Subscribers:T-सीरीज 20 कोटी सबस्क्रायबर्सचा टप्पा पार करणारा जगातील पहिला यूट्यूब चॅनेल बनला आहे.

T-Series YouTube Subscribers: T-Series नं केला जागतिक विक्रम; 2000 मिलियन सबस्क्रायबर्स बेस असलेला ठरला पहिला Youtube चॅनेल
T-Series YouTube Subscribers: T-सीरीज जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. कंपनीनं युट्युबवर 20 कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स मिळवण्याची कामगिरी केली आहे. असं करणार हा जगातील सर्वात पहिला चॅनेल आहे. टी सीरिज भारतातात म्यूजिक लेबल आणि मूवी स्टूडियो म्हणून काम करते. आता जगातील विक्रम मोडीत काढत कंपनीनं YouTube वर 200 मिलियन सदस्य मिळवले आहेत.
T-Series नं ही माहिती ट्विटरवरून दिली आहे. “जगातील नंबर 1 YouTube चॅनेल T-Series नं 200 मिलियन सबस्क्रायबरचा टप्पा पार केला आहे. हा नक्कीच एक ऐतिहासिक क्षण आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब आहे. आता कंपनीं जगातील सर्वात मोठ्या YouTube चॅनेल पैकी एक आहे,” असं ट्विट टी सीरिजनं केलं आहे.
T-Series च्या यशामागील कारणं
टी-सीरीज यूट्यूब चॅनेलवर मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक वेगवेगळ्या कॅटेगरीमधील म्यूजिक ऐकतात. यात अरिजीत सिंह, गुरु रंधावा, जुबिन नौटियाल, तुलसी कुमार, मिथुन, तनिष्क बागची, अमाल मलिक, मीट ब्रोस, रोचक कोहली, सचेत टंडन सारख्या गायकांचा समावेश आहे. तसेच टी-सीरीजनं कबीर सिंह, लूडो, तन्हाजी, थप्पड, पति पत्नी आणि वो, सोनू के टीटू की स्वीटी, रेड, एयरलिफ्ट, आशिकी 2 सहा मेगाहिट चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे.