दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा  

By सिद्धेश जाधव | Published: August 9, 2021 06:12 PM2021-08-09T18:12:51+5:302021-08-09T18:16:13+5:30

Nokia C20 Plus Luanch: Nokia C20 Plus ची किंमत 8,999 रुपयांपासून सुरु होत आहे. हा फोन अँड्रॉइड 11 गो एडिशनसह सादर करण्यात आला आहे.  

Superb Nokia C20 Plus launches in India with two days battery backup; Announcing three more smartphones | दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा  

दोन दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह शानदार Nokia C20 Plus भारतात लाँच; अजून तीन स्मार्टफोन्सची घोषणा  

Next
ठळक मुद्देNokia C20 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहेNokia C20 Plus स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑक्ट-कोर Unisoc SC9863a SoC दिली आहे.सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

गेल्या महिन्यात एचएमडी ग्लोबलने चीनमध्ये Nokia C20 Plus स्मार्टफोन लाँच केला होता. हा बजेट स्मटफोन कंपनीने आज भारतात देखील सादर केला आहे. Nokia C20 Plus मध्ये ड्युअल कॅमेरा आणि 4950mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. नोकिया सी20 प्लसच्या लाँचच्या वेळी कंपनीने Nokia C01 Plus, Nokia C10 आणि Nokia XR20 हे तीन स्मार्टफोन्स भारतात येणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच कंपनी खास भारतीय बाजारात Nokia C30 स्मार्टफोन लाँच करणार आहे.  

Nokia C20 Plus ची किंमत  

Nokia C20 Plus स्मार्टफोन भारतात दोन रॅम व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. या फोनचा छोटा व्हेरिएंट 8,999 रुपयांमध्ये लाँच झाला आहे, यात 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज देण्यात आली आहे. या फोनचा 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. हा फोन आजपासून रिलायन्स डिजिटल स्टोर्स, ऑफलाईन रिटेल स्टोर्स आणि नोकिया इंडियाच्या वेबसाईटवर आजपासून विकत घेता येईल.  

Nokia C20 Plus चे स्पेसिफिकेशन्स 

Nokia C20 Plus स्मार्टफोनमध्ये कंपनीने ऑक्ट-कोर Unisoc SC9863a SoC दिली आहे. हा ड्युअल सिम फोन अँड्रॉइड 11 (गो एडिशन) सह सादर करण्यात आला आहे. यात 3GB पर्यांतच रॅम आणि 32GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे, जी 256GB पर्यंत वाढवता येते. Nokia C20 Plus मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे.  

Nokia C20 Plus मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यातील मुख्य सेन्सर 8-मेगापिक्सलचा आहे आणि सोबत एक 2-मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या नोकिया स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. Nokia C20 Plus मध्ये 4,950mAh ची बॅटरी 10W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. ही बॅटरी सिंगल चार्जमध्ये दोन दिवसांचा बॅकअप देऊ शकते, असा दावा कंपनीने केला आहे.  

Web Title: Superb Nokia C20 Plus launches in India with two days battery backup; Announcing three more smartphones

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.