घरच्या पार्टीची शान वाढवेल सोनीच्या नव्या साउंडबारचा आवाज; इतक्या किंमतीत मिळणार 330W आउटपुट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2022 16:23 IST2022-01-28T16:22:48+5:302022-01-28T16:23:40+5:30
Sony Soundbar: Sony HT-S400 2.1 चॅनेल साउंडबार एकूण 330W साउंड आउटपुट देतो. यातील सबवूफर 130W पर्यंतचा आउटपुट देतो.

घरच्या पार्टीची शान वाढवेल सोनीच्या नव्या साउंडबारचा आवाज; इतक्या किंमतीत मिळणार 330W आउटपुट
Sony HT-S400 साउंडबार जागतिक स्थरावर लाँच करण्यात आला आहे. 330W चा आउटपुट देणारा हा 2.1 चॅनेल साउंडबार एका वायरलेस सबवूफरसह येतो. यात डॉल्बी डिजिटल ऑडियोसह सोनीची एस-फोर्स प्रो फ्रंट सराउंड टेक्नॉलॉजी देखील देण्यात आली आहे.
Sony HT-S400 साउंडबारचे स्पेसिफिकेशन्स
या साउंडबारवरील OLED डिस्प्ले वॉल्यूम, इनपुट सोर्स आणि साउंड सेटिंग्सची माहिती दाखवतो. तसेच या सोबत देण्यात आलेला रिमोट कंट्रोल देण्यात आला आहे. हा साउंडबार बनवण्यासाठी कंपनीनं रीसायकल प्लास्टिकचा वापर केला आहे. यातील वॉयस मोड आणि नाइट मोड साउंडची क्वॉलिटी आणि लेव्हल्स अॅडजस्ट करतात.
Sony HT-S400 2.1 चॅनेल साउंडबार एकूण 330W साउंड आउटपुट देतो. यातील सबवूफर 130W पर्यंतचा आउटपुट देतो. चांगला बेस देण्यासाठी सबवूफरमध्ये 160 मिमी स्पिकर यूनिटचा वापर करण्यात आला आहे. फ्रंट स्पिकर्सला एक एक्स-बॅलेन्स स्पिकर यूनिट देखील मिळतो. समोर असलेली सेपरेटेड नॉच एजमुळे साउंड क्वॉलिटी चांगली मिळते.
कनेक्टिव्हिटीसाठी यात SBC कोडॅकसपोर्टसह ब्लूटूथ v5.0, एचडीएमआय एआरसी पोर्ट आणि ऑप्टिकल कनेक्शन मिळते. हा साउंडबार सोनी ब्रेविया टीव्हीशी वायरलेस पद्धतीने जोडता येतो. आणि टीव्हीवरूनच कंट्रोल करता येतो. साउंडबारमध्ये सोनीची एस-फोर्स प्रो फ्रंट सराउंड टेक्नॉलॉजीसह डॉल्बी डिजिटल ऑडियो देण्यात आला आहे.
Sony HT-S400 ची किंमत
Sony HT-S400 ची किंमत 299.99 डॉलर्स ठेवण्यात आली आहे. ही किंमत सुमारे 22,500 भारतीय रुपयांमध्ये रूपांतरित होते. अधिकृत भारतीय किंमत आणि उपलब्धतेची माहिती मात्र अजून समो आली नाही. हा साउंडबार फक्त ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल.
हे देखील वाचा:
Google-Airtel Partnership: गुगलनं एयरटेलमध्ये गुंतवले 7500 कोटी; जियोला टक्कर देण्याची तयारी?