स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2021 22:10 IST2021-12-14T22:09:18+5:302021-12-14T22:10:13+5:30
Smartphone : सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.

स्मार्टफोनचा अतिवापर धोकादायक! एका रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा
नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे आपल्या अनेक गरजा सोप्या झाल्या आहेत. आपण दूर असतानाही आपल्या कुटुंबीयांसह मित्रांसोबत स्मार्टफोनद्वारे जोडलेले राहतो. पण तुम्हाला माहीत आहे का? स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे तुमची मुले तुमच्यापासून दूर जात आहेत. हे सायबर मीडिया रिसर्चच्या (सीएमआर) इंपॅक्ट ऑफ स्मार्टफोन ऑन ह्युमन रिलेशनशिप 2021 च्या (Impact of Smartphone on Human Relationship 2021) रिपोर्टमधून समोर आले आहे, ज्यामध्ये असे दिसून आले आहे की, तुमच्या स्मार्टफोनच्या अतिवापराचा मुलाच्या मानसिक स्थितीवर वाईट परिणाम होतो.
काय सांगतो सर्वेक्षणातील रिपोर्ट?
1) सर्वेक्षण रिपोर्टनुसार, 66 टक्के लोकांचे म्हणणे आहे की, त्यांनी मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे, तेवढा वेळ ते फोनवर व्यस्त असतात.
2) 74 टक्के भारतीयांच्या मते, स्मार्टफोनमुळे मुलांसोबत त्यांचे नातेसंबंध बिघडत आहेत.
3) 75 टक्के लोकांचे असे म्हणणे आहे की, स्मार्टमुळे लक्ष विचलित होते, ज्यामुळे ते आपल्या मुलांबद्दल अधिक सतर्क राहू शकत नाहीत.
4) 74 टक्के लोकांना असे वाटते की जेव्हा ते स्मार्टफोनमध्ये व्यस्त असतात आणि मुले काही विचारतात तेव्हा त्यांची चिडचिड होते.
5) स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे मुलांचे लक्ष विचलित होत नाही, असे 69 टक्के लोकांचे मत आहे.
6) 90 टक्के पालकांना असे वाटते की स्मार्टफोन वापरामुळे मुले आक्रमक होत आहेत.
7) 85 टक्के पालकांचे असे म्हणणे आहे की मुले स्मार्टफोनमुळे सामाजिक जीवनापासून दूर जात आहेत.
8) 90 टक्के पालकांना असे वाटते की मुलांमध्ये सामाजिक व्यवहार कमी होत आहे.
9) कोविड-19 दरम्यान भारतीयांनी दिवसाचे सुमारे 6.5 तास घालवले आहेत, जे 32 टक्के जास्त आहे.
10) 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांना असे वाटते की स्मार्टफोन्स हे त्यांच्या कुटुंबीयांशी जोडण्यास आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करतात.
11) 94 टक्के लोकांचे म्हणणे असे आहे की स्मार्टफोन त्यांच्या शरीराचा एक भाग बनला आहे आणि तो त्यांच्यापासून वेगळा केला जाऊ शकत नाही.
12) बाहेर जेवताना (70%), दिवाणखान्यात (72%) आणि कुटुंबासोबत बसताना (75%) लोक त्यांचा फोन वापरतात.