नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2024 16:58 IST2024-11-14T16:55:50+5:302024-11-14T16:58:33+5:30
Smartphone Price in 2025: नवीन वर्षात स्मार्टफोन्स खरेदी करणाऱ्यांना जास्त पैसे मोजावे लागतील.

नवीन वर्षात खिशाला कात्री लागणार; 2025 मध्ये स्मार्टफोन्सच्या किमती वाढणार, कारण...
Smartphone Price in 2025: तुम्ही पुढील वर्षात नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला जास्त पैसे मोजावे लागू शकतात. AI फीचर्स असलेले मोबाईल 2024 मध्ये चर्चेत आले, पण हे तंत्रज्ञान मर्यादित डिव्हाईसमध्येच दिले जाते. 2025 मध्ये बहुतांश स्मार्टफोन्समध्ये हे तंत्रज्ञान दिले जाईल, त्यामुळेच या फोन्सची किंमतदेखील वाढणार आहे. AI वैशिष्ट्यांच्या वाढत्या मागणीमुळे, कंपन्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, या दोन्ही आघाडीवर अधिक गुंतवणूक करावी लागत आहे. त्यामुळे स्मार्टफोनच्या किमतीही वाढणार असून, त्याचा फटका ग्राहकांना बसणार आहे.
अॅडव्हान्स्ड कॉम्पोनन्टच्या वाढीव किमती, 5G तंत्रज्ञानातील बदल अन् AI सारख्या फिचर्समुळे फोनच्या किमती वाढतील. काउंटरपॉइंट रिसर्चच्या अहवालानुसार, 2025 मध्ये स्मार्टफोनची जागतिक सरासरी विक्री किंमत 5 टक्क्यांनी वाढेल. पॉवरफूल प्रोसेसर, कॅमेरा आणि AI सारख्या वैशिष्ट्यांसह येणाऱ्या प्रीमियम स्मार्टफोनची वाढती मागणी हे याचे प्रमुख कारण आहे.
AI ची वाढती क्रेझ
स्मार्टफोनमध्ये जनरेटिव्ह एआयचे एकत्रीकरण वेगाने होत आहे. या फीचरची भर पडल्याने स्मार्टफोन प्रिमियम होत आहेत. ग्राहकांना जनरेटिव्ह एआय सारखे फीचर्स आवडतात. त्यामुळे, स्मार्टफोन उत्पादक चांगल्या CPU, NPU आणि GPU क्षमतेसह प्रोसेसर बनवण्यात गुंतवणूक करत आहेत. त्यामुळेच दरात वाढ होताना दिसत आहे. काउंटरपॉईंटच्या अहवालानुसार, जसजसे आपण एआय स्मार्टफोनच्या युगात प्रवेश करत आहोत, तसतसे जनरेटिव्ह एआयचा ट्रेंड वाढेल आणि यासाठी अधिक किंमत मोजावी लागेल.