टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2019 19:33 IST2019-04-02T19:33:03+5:302019-04-02T19:33:14+5:30
स्मार्ट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सार्वजनिक क्लाऊड नेटवर्कचे खासगीकरण करत असून खासगी नेटवर्कच्या माध्यमातून त्याची सुरक्षा वाढवण्यात येते.

टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेसतर्फे एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन
मुंबई : टाटा टेली बिझनेस सर्व्हिसेस (टीटीबीएस) या भारतातील अग्रेसर कनेक्टिव्हिटी सोल्यूशन पुरवठादार कंपनीने एसएमईंसाठी स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशन सादर केले आहे. याद्वारे अंतर्गत, सुधारित सुरक्षा सेवा आणि खासगीकरण क्षमता सुविधा देण्यात येत आहेत.
स्मार्ट व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क (व्हीपीएन) सार्वजनिक क्लाऊड नेटवर्कचे खासगीकरण करत असून खासगी नेटवर्कच्या माध्यमातून त्याची सुरक्षा वाढवण्यात येते. यामुळे व्यापारी व व्यावसायिकांना कनेक्टिव्हिटीसह कोणत्याही सायबर धोक्यापासून सक्रीय संरक्षण प्राप्त होते. टीटीबीएसने या सोल्यूशनचे प्रात्यक्षिक 'डू बिग फोरम' च्या ग्राहकांना कनेक्ट करून सादर केले.
एसएमई विभागाचे उपाध्यक्ष सौरभ शर्मा म्हणाले, डेटा रिच फ्यूचर व्यापारासाठी प्रत्येक डिजिटल व्यवसायात जलद, सुरक्षित आणि परस्परावलंबी कनेक्टिव्हिटी गरजेची असते. आमच्या स्मार्ट व्हीपीएन सोल्यूशनमुळे एसएमईंना त्यांची वृद्धीक्षमता वाढवण्यासाठी मदत होणार असून कनेक्टिव्हिटी किंमत व विकसित ग्राहकानुभव गाठण्यासाठीही हे नेटवर्क व्यापाऱ्यांना मदत करेल. तसेच, क्लाऊड व्यासपिठावरील इन्स्टन्ट अॅक्सेसही सुरक्षितरित्या मिळवता येईल.