धक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 09:40 AM2020-01-23T09:40:22+5:302020-01-23T09:59:03+5:30

धक्कादायक बाब म्हणजे बेजोस यांचा फोन सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच हॅक केला होता.

Shocking... Amazon CEO Jeff Bejos' mobile hacked in 2018; allegations on Saudi king | धक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप

धक्कादायक...अ‍ॅमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांचा मोबाईल हॅक; सौदीच्या राजावर आरोप

googlenewsNext

अ‍ॅमेझॉनचे सीईओ जेफ बेजोस हे नुकतेच भारताच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी भारतात 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची घोषणा केली. मात्र, याच बेजोस यांचा मोबाईल हॅक करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्वाचे म्हणजे अ‍ॅमेझॉन पेद्वारे पैशांची देवाणघेवाणही करण्यात येते. 


धक्कादायक बाब म्हणजे बेजोस यांचा फोन सौदीचा क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनीच हॅक केला होता. एका अहवालात सांगितले गेले आहे की, सलमान यांच्या खासगी नंबरवरून एक मॅसेज बेजोस यांना व्हॉट्सअ‍ॅपवर पाठविण्यात आला होता. याद्वारे बेजोस यांचा फोन हॅक करण्यात आला होता. 

अ‍ॅमेझॉनने भारतात गुंतवणुकीची घोषणा करून उपकार नाही केले; पीयूष गोयल भडकले

बाबो...तासाला 225 कोटी रुपयांपर्यंत कमवितात या जगविख्यात कंपन्या

ब्रिटनचे वृत्तपत्र 'द गार्डियन' मध्ये आलेल्या एका वृत्तामध्ये यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. सौदी प्रिन्सच्या व्हॉट्सअॅप खात्यावरून बेजोस यांना पाठविण्यात आलेल्या मॅसेजमध्ये व्हायरस होता. याद्वारे त्यांचा फोन हॅक करण्यात आला. यानंतर बेजोस यांच्या फोनवरून मोठ्या प्रमाणावर माहिती डिलीट करण्यात आली. 


ही माहिती चोरण्यात आली की केवळ डिलीट करण्यात आली याबाबत काहीच माहिती देण्यात आलेली नसून सौदीच्या अमेरिकी दुतावासानेही 2018 मध्ये ट्वीट करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. 

बेजोस यांच्या वृत्तपत्रामध्ये जमाल खगोशी काम करत होते. 
बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघात जाहीर केलेल्या एका अहवालात ही बाब समोर आली आहे. जेफ बेजोस यांच्या मालकीच्या वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्रामध्ये सौदीच्या राजाच्या आदेशावरून हत्या करण्यात आलेले पत्रकार जमाल खगोशी काम करत होते. सौदीच्या दुतावासात त्यांची हत्या करण्यात आली होती. 


बेजोस यांना ब्लॅकमेल करण्यात आले....
मोबाईल हॅक 2018 मध्ये करण्यात आला. यामध्ये सौदीचा राजा सलमान हा वैयक्तीकरित्या सहभागी होता हे देखील तपासात स्पष्ट झाले आहे. बेजोस यांनी फेब्रुवारी 2019 मध्ये एका ब्लॉगमध्ये अमेरिकन मिडीया इंकचे पत्रकार डेव्हीड पॅकरद्वारा ब्लॅकमेल करण्यात येत असल्याचे म्हटले होते. पॅकर नॅशनल एन्क्वायरर नावाचे टॅब्लॉईड प्रकाशित करतात. याच टॅब्लॉईडमध्ये त्यांनी बेजोस आणि त्यांची प्रेमिका लॉरेन सांचेज यांच्यामधील खासगी मॅसेज छापण्यात आले होते. यामागेही सौदीच्या राजाचाच हात असल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले होते. महत्वाचे म्हणजे पॅकर हे सौदी शासनाच्या जवळचे आहेत. 

Web Title: Shocking... Amazon CEO Jeff Bejos' mobile hacked in 2018; allegations on Saudi king

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.