शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जगात कुठेही वस्तू पाठवा फक्त तासाभरात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2025 07:12 IST

‘इन्व्हर्जन’चे को-फाउंडर जस्टिन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांच्या मते, आर्क हे एक क्रांतिकारी लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म आहे, जे अंतराळात नेटवर्क तयार करून पृथ्वीला आपल्या ‘नजरेखाली’ ठेवेल.

जग कधीचंच एक छोटं ‘खेडं’ झालं आहे. ते दिवसेंदिवस इतकं जवळ येत आहे आणि जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातला संपर्क आता इतका सहज झाला आहे की काही वर्षांपूर्वी आपण त्याची साधी कल्पनाही करू शकलो नसतो. आता त्याच्याच पुढचं पाऊल म्हणजे जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला एखादी वस्तू पाठवायची असेल तर अगदी तासाभरात ती पाठवणं आणि अपेक्षित ठिकाणी पोहोचणं शक्य झालं आहे!

अमेरिकी एरोस्पेस आणि डिफेन्स कंपनी ‘इन्व्हर्जन’नं जगातील पहिलं असं अनोखं डिलिव्हरी यान लाँच केलं आहे, जे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणी फक्त एका तासाच्या आत आवश्यक सामान पोहोचवू शकतं. २२७ किलो वजनाचं सामान या यानातून एकावेळी पाठवलं जाऊ शकतं. या यानाचं नाव  आहे ‘आर्क’ आणि ताशी तब्बल २४,७०० किलोमीटर वेगानं ते प्रवास करू शकतं. हे यान फक्त ८ फूट उंच आणि ४ फूट रुंद आहे. अंतराळातून परतताना स्वतःच स्वत:ला ते कंट्रोल करतं आणि पॅराशूटच्या साहाय्यानं थेट लॅण्ड होतं. त्यासाठी रनवेचीही अजिबात गरज नाही. अर्थातच हे यान केवळ सामान वाहतुकीसाठी आहे. यात माणसांना किंवा अंतराळवीरांना नेण्याची सोय नाही.

सध्या स्पेसएक्ससारख्या कंपन्यांच्या सॅटेलाइट मिशनसाठी स्पेसक्राफ्ट लाँचिंग, परतीचा प्रवास आणि इतर खर्च मिळून सुमारे ५५ लाख डॉलर (सुमारे ४८ कोटी रुपये) इतका खर्च येतो. त्याच्या तुलनेत ‘आर्क’चं ऑपरेशन अतिशय स्वस्त आहे, कारण ते पूर्णपणे रियुजेबल आहे.‘इन्व्हर्जन’नं आर्कसाठी स्वतंत्र युनिट उभारलं आहे. हे यान नीट चालतं की नाही, अपेक्षित ठिकाणी, अपेक्षित वेळी डिलिव्हरी पोहोचते की नाही यासदंर्भात कंपनीनं आतापर्यंत किमान डझनभर ‘ड्रॉप टेस्ट’ही घेतल्या आहेत आणि या प्रत्येक चाचणीत ते शंभर टक्के यशस्वी झालं आहे. यासंदर्भात एरोडायनॅमिक मॉडेलिंगही पूर्ण झालं आहे. आर्क या यानाला आधीच पृथ्वीच्या कक्षेत ठेवलं जाईल आणि जेव्हा गरज भासेल, तेव्हा एका तासाच्या आत जगभर कुठेही आवश्यक डिलिव्हरी पोहोचवली जाईल!

‘इन्व्हर्जन’चे को-फाउंडर जस्टिन फियास्केटी आणि ऑस्टिन ब्रिग्स यांच्या मते, आर्क हे एक क्रांतिकारी लॉजिस्टिक्स प्लॅटफॉर्म आहे, जे अंतराळात नेटवर्क तयार करून पृथ्वीला आपल्या ‘नजरेखाली’ ठेवेल.

यामुळे अनेक गोष्टी शक्य होतील. नैसर्गिक आपत्ती, युद्ध किंवा महामारीसारख्या परिस्थितीत, औषधं, लस, वैद्यकीय उपकरणं एका तासात जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवणं शक्य होईल. लष्करी वापरासाठी तातडीचं साहित्य, ड्रोन, टेक्नॉलॉजी उपकरणं त्वरित पोहोचवता येऊ शकेल. यामुळे युद्धनीतीतही क्रांती घडू शकेल. सध्याचा आंतरराष्ट्रीय मालवाहतूक उद्योग समुद्री मार्ग, हवाई मार्गावर आधारित आहे. आर्कसारख्या यानामुळे भविष्यात पारंपरिक कार्गो शिपिंग हळूहळू कालबाह्य होऊ शकतं. पुनर्वापरक्षम डिझाइनमुळे लॉजिस्टिक्स खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल. विशेषतः महागड्या, हाय-प्रायोरिटी वस्तूंसाठी ही पद्धत अधिक उपयुक्त ठरेल. या संकल्पनेमुळे येणाऱ्या काळात अंतराळाचा वापर केवळ संशोधनापुरता मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाचा तो अविभाज्य भाग होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Send Goods Worldwide in an Hour: Inversion's Revolutionary Delivery!

Web Summary : Inversion's 'Arc' can deliver 227 kg globally in one hour. This reusable spacecraft offers cheaper logistics for urgent supplies, revolutionizing disaster relief, military operations, and potentially replacing traditional cargo shipping. It promises a future where space is integral to daily life.
टॅग्स :technologyतंत्रज्ञान