शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

iPhone 8 आणि iPhone 8 Plus ची भारतात आजपासून विक्री सुरू, कुठे कराल खरेदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 12:24 PM

आजपासून भारतात अॅपलचा बहुप्रतिक्षित iPhone 8 आणि iPhone 8 Plus अधिकृतपणे लॉन्च होत आहे. भारतात अॅपलचं स्टोअर नसल्याने कंपनीच्या...

नवी दिल्ली - आजपासून भारतात अॅपलचा बहुप्रतिक्षित iPhone 8 आणि iPhone 8 Plus अधिकृतपणे लॉन्च होत आहे.  भारतात अॅपलचं स्टोअर नसल्याने कंपनीच्या पार्टनार स्टोअर आणि इ-कॉमर्स वेबसाइटवर म्हणजेच ऑनलाइन आणि ऑफलाइन आयफोन खरेदी करता येणार आहे. क्रोमा, रिलायंस डिजिटल स्टोअर आणि विजय सेल्स यासारख्या रिटेलर्सकडे आयफोन खरेदी करता येऊ शकतो. देशभरात 30 हजार स्टोअर्समधून हे फोन खरेदी करता येणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजेपासून फोनची विक्री सुरू होणार आहे तर प्री-ऑर्डर 22 ऑक्टोबरपासून सुरू आहे. 

भारतात किंमत किती - iPhone 8 (64GB)         - 64 हजार रूपयेiPhone 8 (256GB)       - 77 हजार रूपयेiPhone 8 Plus               -  73 हजार रूपयेiPhone 8 Plus(256GB)- 86 हजार रूपये

iPhone 8, iPhone 8 + वैशिष्ट्ये -- 15 सप्टेंबरपासून आयफोन बुकींग सुरु होणार आहे. तर 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असणार आहे.- आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.- आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा - दोन्ही आयफोन  64 जीबी, 256 जीबीमध्ये उपलब्ध असणार - नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल- आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस मध्ये 12 मेगाफ्किसल कॅमेरा  - 7000 सीरिज अॅल्युमिनियम, लेजर वेल्डेड स्टिल आणि कॉपर स्ट्रक्चर-  वायरलेस चार्जिगची सुविधा -  आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले  -‘होम बटण’ नसेल-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल- ड्युअल कॅमेरा सेटअप- डायनॅमिक रेंजसाठी न्यू कलर फिल्टरची सुविधा- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल- 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

आयफोन एक्सची वैशिष्ट्ये - - प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्द होण्यास सुरूवात होईल- यफोन एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.  - आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा - 64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल. - वायरलेस चार्जिगची सुविधा- मोबाईलकडे पाहिले तरी अनलॉक होणार- नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल- वॉटरप्रुफ- ‘होम बटण’ नसेल- फिंगर प्रिंट स्कॅनर’ - इन्फ्रारेड कॅमेरा (अंधारातही फोटो काढता येणार)- ग्लास डिझाइन- उत्कृष्ट फोटोग्राफी आणि 4K वीडिओग्राफी- ड्युअल कॅमेरा सेटअप- ऑग्मेंटेड रिएलिटी फीचर- FaceID उपलब्ध- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

अ‍ॅपलच्या टीव्हीचे नवे फिचर्स आणि वैशिष्ट्ये -- 4K HDR अशी प्रणाली - सध्या या अ‍ॅपल टीव्हीची किंमत 149 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. - 32 जीबी टीव्हीची 11462 रूपये आणि 64 जीबीची12742 रूपये - एचडीआर 10, डॉल्बी व्हिजनला सर्पोट करणार- हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो 22 सप्टेंबरपासून मिळेल. - एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन  क्षमता असेल. - साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.- नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील. - अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.- तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.- याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात. 

 वॉचची वैशिष्ट्ये - २२ सप्टेंबर रोजी अ‍ॅपल वॉच सीरिज-३ मार्केटमध्ये उपलब्ध होणार- कॉलही करता येणार- तुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर अ‍ॅपल वॉच तुम्हाला सुचना देणार- अ‍ॅपल वॉच तुमच्या हृदयाचे ठोके ही मोजणार- चौपाटीवर जाताना किंवा वॉकिंगवर जाताना तुमचा मोबाइल घरी ठेऊन केवळ घड्याळ हातात घालून जाऊ शकता- अ‍ॅपल वॉचमुळे प्रत्येकवेळी तुम्हाला आयफोन सोबत ठेवायची गरज नाही- अ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये इलेक्ट्रॉनिक सिम असणार- अॅपल वॉच - मध्ये 40 मिलियन गाणी संग्रहित करता येणार- अ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये जलद वायफायसाठी डब्ल्यू२ चीप लावण्यात येणार- सेल्यूलर आणि नॉन सेल्यूलर दोन्ही पर्यायात उपलब्ध.- अॅपल वॉच सीरिज ३ सध्या तरी भारतात उपलब्ध येणार नाही. - वायफायची सुविधा- गुगल मॅप दाखवेल- गाणे ऐकवेल- वॉटरप्रुफ- अ‍ॅपल वॉचमधील पहिल्या श्रेणीतील घडाळ्याची किंमत 249 डॉलर, दुसऱ्या श्रेणीची 329 डॉलर तर तिसऱ्या श्रेणीची 399 डॉलर ऐवढी असणार    आहे. तिसऱ्या श्रेणीतील वॉच ही एकप्रकारे तुमचा मनगटावरील मोबाईलच असेल.

टॅग्स :Apple iPhone 8अ‍ॅपल आयफोन ८Apple iPhone 8 Plusअ‍ॅपल आयफोन ८ प्लसApple iPhone Xअ‍ॅपल आयफोन X