मुंबई, दि. 22 - जर तुम्ही अॅपलचा नवा आयफोन 8 किंवा 8 प्लस खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी गु़ड न्यूज आहे. रिलायन्स जिओ नवीन आयफोन बूक करणा-यांना 10 हजार रूपयांची सूट देत आहे. 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबरपर्यंत नवा आयफोन बूक केल्यास जिओकडून 10 हजार रूपयांची कॅशबॅक ऑफर आहे. मात्र ही ऑफर केवळ सिटी बॅंकेच्या क्रेडीट कार्डने खरेदी केल्यावरच मिळणार आहे. कंपनीकडून आयफोन 8 आणि 8 प्लसवर 70 टक्के बायबॅक गॅरेन्टी दिली जात आहे. 1 वर्षासाठी ही रिटर्न पॉलिसी लागू असणार आहे. ही ऑफर रिलायन्स डिजीटल स्टोअर्स आणि जिओ डॉट कॉम या वेबसाइटवरून खरेदी केल्यासच लागू होणार आहे. भारतात 29 सप्टेंबरपासून नव्या आय़फोनची प्री-बुकींग सुरू होणार आहे. 
जिओकडून आयफोन 8 आणि 8 प्लससाठी 799 रूपयांच्या टॅरिफ प्लॅनचीही घोषणा करण्यात आली आहे. हा पोस्टपेड प्लॅन असून यामध्ये दर महिन्याला 90 जीबी डेटा मिळणार आहे.  

भारतात किंमत किती - 
iPhone 8 (64GB)         - 64 हजार रूपये
iPhone 8 (256GB)       - 77 हजार रूपये
iPhone 8 Plus               -  73 हजार रूपये
iPhone 8 Plus(256GB)- 86 हजार रूपये

iPhone 8, iPhone 8 + वैशिष्ट्ये -
- 15 सप्टेंबरपासून आयफोन बुकींग सुरु होणार आहे. तर 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असणार आहे.
- आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल.
- आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा 
- दोन्ही आयफोन  64 जीबी, 256 जीबीमध्ये उपलब्ध असणार 
- नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल
- आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस मध्ये 12 मेगाफ्किसल कॅमेरा  
- 7000 सीरिज अॅल्युमिनियम, लेजर वेल्डेड स्टिल आणि कॉपर स्ट्रक्चर
-  वायरलेस चार्जिगची सुविधा 
-  आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले  
-‘होम बटण’ नसेल
-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- डायनॅमिक रेंजसाठी न्यू कलर फिल्टरची सुविधा
- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल
- 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

आयफोन एक्सची वैशिष्ट्ये - 
- प्री-ऑर्डर 27 ऑक्टोबर पासून सुरू होईल आणि ते स्टोअरमध्ये 3 नोव्हेंबरपासून उपलब्द होण्यास सुरूवात होईल
- यफोन एक्सची किंमत 999 डॉलर पासून सुरुवात होत आहे. भारतात या फोनची किंमत एक लाख रुपयांपर्यंत असू शकते.  
- आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा 
- 64GB आणि 256GB अशा दोन प्रकारांमध्ये आयफोन एक्स बाजारात मिळेल. 
- वायरलेस चार्जिगची सुविधा
- मोबाईलकडे पाहिले तरी अनलॉक होणार
- नव्या आयफोनची स्मार्ट चीप सर्वाधिक पॉवरफुल
- वॉटरप्रुफ
- ‘होम बटण’ नसेल
- फिंगर प्रिंट स्कॅनर’ 
- इन्फ्रारेड कॅमेरा (अंधारातही फोटो काढता येणार)
- ग्लास डिझाइन
- उत्कृष्ट फोटोग्राफी आणि 4K वीडिओग्राफी
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- ऑग्मेंटेड रिएलिटी फीचर
- FaceID उपलब्ध
- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 

अ‍ॅपलच्या टीव्हीचे नवे फिचर्स आणि वैशिष्ट्ये -
- 4K HDR अशी प्रणाली 
- सध्या या अ‍ॅपल टीव्हीची किंमत 149 डॉलर एवढी ठेवण्यात आली आहे. 
- 32 जीबी टीव्हीची 11462 रूपये आणि 64 जीबीची12742 रूपये 
- एचडीआर 10, डॉल्बी व्हिजनला सर्पोट करणार
- हा टीव्ही सध्या भारतात उपलब्ध होणार नसला तरी अमेरिकेत तो 22 सप्टेंबरपासून मिळेल. 
- एचडीआर टेन आणि डॉल्बी व्हिजन  क्षमता असेल. 
- साध्या एचडी टीव्हीपेक्षा चार हजार पट पिक्सेल्स असलेला हा टीव्ही असेल.
- नेटफ्लिक्सवरील चार हजार पिक्चर पाहता येतील. 
- अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडोओ यावर वर चालेल.
- तुमच्याकडे जर आयपॅड किंवा आयफोन असेल तर तुमच्यासाठी अ‍ॅपल टीव्ही हा एक उत्तम पर्याय असेल.
- याच कार्यक्रमात लाँच करण्यात आलेला स्काय नावाचा व्हिडीओ गेमही या टीव्हीवर खेळता येणार आहे. हा गेम आठ प्लेअर कोठेही बसून खेळू शकतात. 

 वॉचची वैशिष्ट्ये 
- २२ सप्टेंबर रोजी अ‍ॅपल वॉच सीरिज-३ मार्केटमध्ये उपलब्ध होणार
- कॉलही करता येणार
- तुमच्या हृदयाचे ठोके वाढले तर अ‍ॅपल वॉच तुम्हाला सुचना देणार
- अ‍ॅपल वॉच तुमच्या हृदयाचे ठोके ही मोजणार
- चौपाटीवर जाताना किंवा वॉकिंगवर जाताना तुमचा मोबाइल घरी ठेऊन केवळ घड्याळ हातात घालून जाऊ शकता
- अ‍ॅपल वॉचमुळे प्रत्येकवेळी तुम्हाला आयफोन सोबत ठेवायची गरज नाही
- अ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये इलेक्ट्रॉनिक सिम असणार
- अॅपल वॉच - मध्ये 40 मिलियन गाणी संग्रहित करता येणार
- अ‍ॅपल सीरिज-३ वॉचमध्ये जलद वायफायसाठी डब्ल्यू२ चीप लावण्यात येणार
- सेल्यूलर आणि नॉन सेल्यूलर दोन्ही पर्यायात उपलब्ध.
- अॅपल वॉच सीरिज ३ सध्या तरी भारतात उपलब्ध येणार नाही. 
- वायफायची सुविधा
- गुगल मॅप दाखवेल
- गाणे ऐकवेल
- वॉटरप्रुफ
- अ‍ॅपल वॉचमधील पहिल्या श्रेणीतील घडाळ्याची किंमत 249 डॉलर, दुसऱ्या श्रेणीची 329 डॉलर तर तिसऱ्या श्रेणीची 399 डॉलर ऐवढी असणार    आहे. तिसऱ्या श्रेणीतील वॉच ही एकप्रकारे तुमचा मनगटावरील मोबाईलच असेल.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.