Apple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 12:37 AM2017-09-13T00:37:23+5:302017-09-13T00:37:23+5:30

अॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हे मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दलची घोषणा केली.

Apple iPhone Event: iPhone-8 and iPhone-8 Plus Launch | Apple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

Apple iPhone Event : आयफोन-८ आणि आयफोन-८ प्लस लॉन्च, जाणून घ्या फिचर्स

googlenewsNext

सॅन फ्रान्सिस्को, दि. 12 : अॅपलनं आपल्या बहुप्रतीक्षित आयफोनची नवी आवृत्ती आयफोन 8 व आयफोन 8 प्लस हे मोबाईल लाँच केले. अॅपलचे सीईओ टिम कुक यांनी याबद्दलची घोषणा केली. सिल्वर, स्पेस ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात अॅपल मोबाइल मिळणार आहे. आयफोन 8ची किंमत 699 डॉलर (44760 रुपये) तर आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (51163)पासून सुरु होईल. आयफोनमध्ये स्पेशल ऑडिओची सुविधा, ऑब्जेक्टकडे जाताच आवाज वाढतो आणि ऑब्जेक्टला मागे घेताच आवाज कमी होतो अशी सुविधा करण्यात आला आहे. अॅपलचे हे दोन्ही आयफोन  64 जीबी, 256 जीबीमध्ये उपलब्ध असणार आहेत. 15 सप्टेंबरपासून आयफोन बुकींग सुरु होणार आहे. तर 22 सप्टेंबरपासून बाजारात उपलब्ध असणार आहे. यामध्ये ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे. आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले आहे.  

जानेवारी 2007 मध्ये पहिल्यांदाच अॅपलचे सहसंस्थापक आणि सीईओ टीव्ही जॉब्स यांनी आयफोन लाँच केला होता. अजूनही आयफोन हा जगातील महागडा फोन ओळखला जातो. आयफोनने 1000 डॉलरचा आकडाही ओलांडला आहे. 

लॉचिंगच्या कार्यक्रमापूर्वी स्टीव्ह जॉब्स थिएटरचे उदघाटन करण्यात आले. यावेळी अ‍ॅपलचे सीईओ टीम कुक यांनी स्टीव्ह जॉब्स यांच्या आठवणींना उजाळा दिला.  स्टीव्ह जॉब्सच्या आवाजील एका क्लिपने या सुरुवात झालेल्या सोहळ्यात व्यासपीठावर कंपनीचे टीम कुक अवतरले तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. स्टिव्ह जॉब्जचे शब्द, त्याचा आवाज काळजाला भिडणारा असतो, असं सांगताना टीम कुक यांचे डोळे पाणावले. आता आपण ख-या अर्थाने स्टिव्हच्या स्वप्नांची पूर्तता करत आहोत. पुढे म्हणाले की,  आगामी काळात जगातील प्रत्येक व्यक्तीच्या हातात आयफोन असेल. एक हजार व्यक्ती बसतील इतकी स्टीव्ह जॉब्स थिएटरची क्षमता आहे.

या वर्षाअखेर पर्यंत अ‍ॅपलचे मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरीत होणार आहे. 75 एकर जमीनीवर अ‍ॅपलचे स्टिव्ह जॉब्स स्पेसशिप आहे, यामध्ये 9 हजाराहून अधिक वृक्ष आहेत. कुपेरटिनो येथील अ‍ॅपलच्या नव्या कॅम्पसमधील स्टीव्ह जॉब्स थिएटरमध्ये हा सोहळा रंगला. अ‍ॅपलचा हा कॅम्पस पाहण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली. स्टीव्ह जॉब्स थिएटरमधील हा पहिलाच कार्यक्रम आहे. पहिल्यांदाच पत्रकारांसाठी स्टीव्ह जॉब थिएटरमध्ये प्रवेश देण्यात आला. 

iPhone 8, iPhone 8 + वैशिष्ट्ये -
- आयफोन-8 आणि आयफोन-8 प्लस मध्ये 12 मेगाफ्किसल कॅमेरा  
- 7000 सीरिज अॅल्युमिनियम, लेजर वेल्डेड स्टिल आणि कॉपर स्ट्रक्चर
-  वायरलेस चार्जिगची सुविधा 
-  आयफोन 8 मध्ये 4.7 इंचाचा डिस्प्ले तर आयफोन 8 प्लस मध्ये  5.5 इंचाचा एचडी डिस्प्ले  
-‘होम बटण’ नसेल
-‘फिंगर प्रिंट स्कॅनर’ असेल
- ड्युअल कॅमेरा सेटअप
- डायनॅमिक रेंजसाठी न्यू कलर फिल्टरची सुविधा
- आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसची बॅटरी लाईफ वाढलेली असेल
- ३D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले 
 

Web Title: Apple iPhone Event: iPhone-8 and iPhone-8 Plus Launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.